औरंगाबाद खंडपीठ 
मराठवाडा

उस्मानाबादच्या सीईओंविरोधात खंडपीठाने बजावले जामीनपात्र वॉरंट

शासन निर्णयानुसार कनिष्ठ अभियंत्याला वेतनश्रेणी मंजूर केली नाही. त्यामुळे उस्मानाबादच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दोन वेळेस नोटीस बजावूनही न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांना जामीनपात्र वॉरंट बजावले आहे.

अनिल जमधडे

औरंगाबाद : शासन निर्णयानुसार कनिष्ठ अभियंत्याला वेतनश्रेणी मंजूर केली नाही. त्यामुळे उस्मानाबादच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दोन वेळेस नोटीस बजावूनही न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांना जामीनपात्र वॉरंट बजावले आहे. उस्मानाबाद (Osmanabad) येथील स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाला बारा वर्षांनंतर कनिष्ठ अभियंता म्हणून वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली होती. त्यानंतरच्या बारा वर्षांनंतर पुढील वेतनश्रेणी उपअभियंता पदाची आहे. पण, त्यांना शाखा अभियंता पद दिले व शंभर रुपयांचा ग्रेड पे देण्यात आला होता. शासनाच्या एक एप्रिल १९९९ च्या निर्णयाप्रमाणे शाखा (Bombay High Court's Aurangabad Bench) अभियंता हे प्रमोशनचे पद नाही. उच्च न्यायालयाने एका प्रकरणात शाखा अभियंता पद प्रमोशनचे नाही असे जाहीर (Aurangabad) केले आहे.

त्यामुळे अर्जदारांना शाखा अभियंता ऐवजी उपअभियंता पदाची वेतनश्रेणी देणे आवश्यक होते. वेतनश्रेणी दिली नसल्यामुळे अर्जदार भारत फेरे व इतरांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यात उच्च न्यायालयाने उस्मानाबादच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दोन वेळेस नोटीस बजावूनही खंडपीठात हजर राहिले नसल्यामुळे त्यांना जामीनपात्र वॉरंट बजावले आहे. पुढील सुनावणी ३० नोव्हेंबरला होईल. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. आर. पी. भूमकर यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. कैलास सोनेने यांनी साहाय्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठरलं! तीन आठवडे चालणार यंदाचं पावसाळी अधिवेशन, २२ जूनपासून होणार सुरुवात, कोणते मुद्दे राहणार चर्चेत?

Sanchita Ugale: छावा चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्रीने संपवलं जीवन, नालासोपाऱ्यातील राहत्या घरात आढळला मृतदेह; DDLJ मध्येही काम केलं होतं

पाकिस्तानी हवाई दलाचं विमान कोसळलं, २ पायलटचा मृत्यू; घटना CCTVत कैद

Mumbai News: मेट्रोमुळे 'बेस्ट'ला फटका! बस थांबे तोडल्याने जाहिरातीचा महसूल बुडाला

Latest Marathi News Live Update : नागपूरातील संविधान चौकात उद्या कॉकरोज जनता पार्टीचं आंदोलन

SCROLL FOR NEXT