corona condition in Aurangabad. 
मराठवाडा

Corona Update: मराठवाड्यात कोरोनाचे ५७ बळी; औरंगाबादेतील सर्वाधिक २६ जणांचा समावेश

मनोज साखरे

औरंगाबाद: मराठवाड्यात कोरोनाने आणखी ५७ जणांचा बळी घेतल्याची नोंद शुक्रवारी (ता.२६) झाली.  त्यात औरंगाबादेतील सर्वाधिक २६, तर नांदेडमध्ये १४, परभणीत ६, जालन्यात ५, बीड-उस्मानाबादेत प्रत्येकी दोन, लातूर-हिंगोलीतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. 

भानुदासनगर, जवाहर कॉलनी येथील पुरुष (वय ९०), कटकटगेट येथील पुरुष (५४), औरंगपुरा येथील पुरुष (७७), मिलिंदनगर, उस्मानपुरा येथील पुरुष (६६), कन्नड येथील पुरुष (३५), पडेगाव येथील पुरुष (५२), घटांब्री येथील पुरुष (८०), कन्नड येथील महिला (७१), पालेश्‍वर कॉलनी, कन्नड येथील पुरुष (६७), सिडको औरंगाबाद येथील पुरुष (५६), लासूरगाव (ता. वैजापूर) येथील पुरुष (८४), बेगमपुरा येथील पुरुष (६७),

पहाडसिंगपुरा येथील महिला (९५), जुनाबाजार येथील पुरुष (८६), शुभाश्री कॉलनी एन-सहा सिडको येथील महिला (६५), भावसिंगपुरा येथील महिला (६१), सिडको एन-सहा येथील पुरुष (६५), हडको कॉर्नर येथील महिलेचा (८५) घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. खासगी व समर्पित कोविड रुग्णालयांत उपचारादरम्यान आठ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत १५३१ जणांचा मृत्यू झाला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात नवे १७८७ बाधित-
जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २६) दिवसभरात १ हजार ७८७ कोरोनाबाधितांची भर पडली. रुग्णसंख्या ७५ हजार ६३५ झाली असून ५९ हजार १६८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १४ हजार ९३६ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, बरे झालेल्या आणखी १ हजार १४ रुग्णांना सुटी देण्यात आली.

असे वाढले रुग्ण- 
नांदेड- ९७० 
लातूर- ५३८ 
जालना ४१५ 
बीड ३८३ 
परभणी २६३ 
हिंगोली १८६ 
उस्मानाबाद १५५ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT