संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

Vidhan Sabha 2019 : औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 65.67 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 65.67 टक्के मतदान झाले आहे. सिल्लोड मतदारसंघात सर्वाधिक 74.83, तर सर्वांत कमी औरंगाबाद मध्य मतदारसंघात 59 टक्‍के मतदान झाले. सोमवारी काही ठिकाणी उशिरापर्यंत मतदान झाले. त्यामुळे प्रशासनाने अंदाजानुसार आकडेवारी दिली होती. वरील अंतिम आकडेवारी मंगळवारी (ता. 22) रात्री जाहीर केली. 

जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारासंघांमध्ये एकूण 345 केंद्रांवर वेबकास्टिंग देखील करण्यात आले. विधानसभानिहाय मतदान क्षेत्रात प्रत्येकी दोन याप्रमाणे 18 सखी, 18 आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आली होती. या माध्यमातून वेगळेपण पाहायला मिळाले. 
  
असे आहेत उमेदवार 
नऊ मतदारसंघांत एकूण 133 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. यामध्ये सर्वाधिक उमेदवार औरंगाबाद पूर्व विधानसभा क्षेत्रातून 34, तर सर्वांत कमी सात उमेदवार सिल्लोड विधानसभा क्षेत्रातून आहेत. मतदानप्रक्रिया सुलभ होण्यासाठी प्रशासनाकडून सर्व मतदान केंद्रांवर पुरेशा प्रमाणात बॅलेट, नियंत्रण युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याचे प्रकार समोर आले. 
 
जिल्ह्यातील मतदान केंद्र 
जिल्ह्यात मतदानासाठी तीन हजार 24 मतदान केंद्र होती. यामध्ये सिल्लोड 361, कन्नड 351, फुलंब्री 348, औरंगाबाद मध्य 324, औरंगाबाद पश्‍चिम 342, औरंगाबाद पूर्व 312, पैठण 325, गंगापूर 315 आणि वैजापूर येथे 346 या मतदान केंद्रांचा समावेश होता. 
 

मतदारसंघ मतदारांची संख्या मतदान करणाऱ्यांची संख्या टक्‍केवारी 
सिल्लोड 3, 16,378 2, 36,736 74.83 
कन्नड 3, 14, 137 2,14,400 68.25 
फुलंब्री 3,26,014 2,27,164 69.68
 मध्य 3,25735 1,92,805 59.19 
पश्‍चिम 3,35,877 1,98,182 59 
पूर्व 3,19,155 1,94,381 60.9 
पैठण 2,93,926 2,12, 495 72.3 
गंगापूर 3,13,279 2,02, 752 64.72
वैजापूर 3, 09,780 1,95, 470 63.1 
एकूण 28,54,281 18,74,385 65.67 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT