नागपूर-मुंबई महामार्ग बंद sakal
मराठवाडा

औरंगाबाद : नागपूर-मुंबई महामार्ग बंद

शेतशिवारासह लासूरगावात पाणी शिरण्याची शक्यता वर्तवली जात असून प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिला आहे.

अविनाश संगेकर

लासूर स्टेशन (जि.औरंगाबाद) : लासूर स्टेशन परिसरात रात्री तीन वाजेपासून संततधार पाऊस सुरू असून लासूरगाव (ता.वैजापूर) येथून वाहणारी शिवनानदीला पुन्हा एकदा पूर आला आहे.नदीवरील फरशी पुल पाण्याखाली असून मुंबई महामार्गावरील पुलावरही पाणी जाण्याची शक्यता असून बोर दहेगावच्या बोर नदीच्या पुलावरूनही गुडघाभर पाणी वाहत असल्याने वाहतूक खोळंबली असून महामार्ग बंद झाला आहे. लासूरगावात तब्बल तीस वर्षांनी अशी पूर परिस्थिती दुसऱ्यांदा ओढवली.देवी दाक्षायणी मंदिराला पाणी लागले असून शिवना टाकळी प्रकल्पातुन पाणी सोडल्याने नदीकाठच्या शेतशिवारासह लासूरगावात पाणी शिरण्याची शक्यता वर्तवली जात असून प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिला आहे.

लासूर स्टेशन परिसरात रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून लासूरगावच्या शिवना नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे.दरम्यान नदीवरील फरशी पुल दिसेनासा झाला असून पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने वाहतूक बंद आहे.लासूरगावासह अमानतपुरवाडी, राहेगाव, भायगाव, उंदिरवाडी, धोंदलगाव आदी गावांचा लासूर स्टेशनशी संपर्क तुटला असून नदीकाठी असलेल्या दाक्षायणी देवीच्या मंदिराला पाणी लागले तर गेल्या काही दिवसांपूर्वी गावात वेशीपर्यंत पाणी पोचले होते तशीच काहीशी पूरपरिस्थिती उदभवणार असल्याचे दिसत आहे.बोर दहेगावच्या बोर नदीला पूर आलेला असल्याने वाहतूक खोळंबून नागपूर मुंबई महामार्ग बंद झाला आहे.सावंगीची मार्तंडी नदीची ओसंडून वाहत असल्याने नदीवर अवलंबून असलेला शिल्लेगाव प्रकल्प यंदा भरण्याची चिन्हे आहेत.

परिसरात पडलेल्या प्रचंड अशा पावसाने छोटे मोठे पाझर तलावही फुल्ल झाले आहे तर शिवना नदीतील सर्वच केटीवेअर मागच्या पुरातच फुटल्याने पाणी अडण्याची शक्यता नाही.शिवनाच्या फरशी पुलावरून पाणी असल्याने पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे लासुरगावात जाणाऱ्यांना परतून तब्बल सहा किलोमीटर फेरा मारून मुंबई महामार्गावरील पुलावरून लासुरगावात जावे लागत आहे. या फरशी पुलाची उंची वाढवावी अशी मागणी कित्येक वर्षापासून करण्यात येत आहे.या तिन्ही नद्यांच्या पाण्यामुळे विहिरींची पाणीपातळी वाढली आहे.परंतु शेतात पाणी तुंबल्याने पिके सडली असून शेतकऱ्याने अतोनात नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT