Aurangabad HighCourt News 
मराठवाडा

बळीराजाची जमिन घेतली पण मोबदलाच नाही आता 20 लाख भरण्याचे आदेश

सुषेन जाधव

औरंगाबाद : याचिकाकर्त्या शेतकऱ्याची जमिन राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आली, मात्र जमिनीच्या मोबादल्यापोटी पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली. याचिकेच्या सुनावणीदरम्यान खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक व न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे यांच्या पीठाने राष्ट्रीय महामार्ग विभागास २० लाख रुपये अंतरिम रक्कम १५ एप्रिल २०२० पर्यंत जमा करण्याचे आदेश दिले.

प्रकरणात रामराव किशनराव देशपांडे (रा. एकेफळ, ता. भोकरदन जि. जालना) यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. याचिकेनुसार राष्ट्रीय महामार्गाच्या ७५३ रुंदीकरणासाठी जमिन अधिग्रहित करण्यात आली होती. महामार्गाचे बांधकामही पूर्ण झाले. मात्र याचिकाकर्ते रामराव देशपांडे यांना भूसंपादनाच्या पोटी मोबदला मिळाला नाही. त्यानाराजीने त्यांनी औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका सादर केली. सदर याचिकेमध्ये महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी जालना, जिल्हा परिषद जालना, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, औरंगाबाद यांना प्रतिवादी करण्यात आले होते.

गेल्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने सर्व प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचे आदेश पारित केले होते. त्यानंतर सर्व प्रतिवादींना रीतसर नोटिसा बजावण्यात आल्या. नोटीस बजावण्यात येऊनही राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे खंडपीठात कोणी म्हणणे न मांडले नाही. सदर प्रकरणाची ११ मार्च २०२० रोजी सविस्तर सुनावणी झाली असता, राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे कोणीही हजर न झाल्याचे निरीक्षण नोंदवून खंडपीठाने सदर विभागास शपथपत्र सादर करण्याची मुभा दिली, मात्र १५ एप्रिल २०२० पर्यंत २० लाख रुपयांची अंतरीम रक्कम खंडपीठात जमा करण्याचे निर्देश दिले. याचिकेवर पुढील सुनावणी २० एप्रिल २०२० रोजी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT