Rain Hailstorm Forcast In Marathwada  
मराठवाडा

मराठवाड्यात आज वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता, सलग चार दिवस राहणार वादळी वारे

सुषेन जाधव

औरंगाबाद : हवामानात सातत्याने बदल होत असून मराठवाड्यात गुरुवारी (ता.१८) वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट, गारपीट तसेच हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा यांच्यातर्फे देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने बीड, उस्मानाबाद, जालना, नांदेड, परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय शुक्रवारी (ता.१९) उस्मानाबाद, नांदेड व हिंगोली जिल्ह्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर औरंगाबाद, जालना, परभणी, बीड जिल्ह्यांत वादळी वारा, विजांचा कडकडाट व पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शनिवारी (ता.२०) बीड, उस्मानाबाद, लातूर आणि हिंगोली या चार जिल्ह्यांत वादळी वारा, विजांचा कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर औरंगाबाद, जालना, परभणी व नांदेड जिल्ह्यांत वादळीवारा, विजांचा कडकडाट व पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच २१ मार्च रोजी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचेही कळविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT