Aurangabad Lok Sabha Esakal
मराठवाडा

Aurangabad Lok Sabha: औरंगाबादमध्ये कांटे की टक्कर, खैरे पिछाडीवर, भूमरे की जलील? कोणी घेतली आघाडी

Aurangabad Lok Sabha: लोकसभा निवडणुकांचे कल समोर येत आहेत. अशातच राज्याचे लक्ष लागलेल्या आणि तिहेरी लढत होत असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चुरस दिसून येत आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

लोकसभा निवडणुकांचे कल समोर येत आहेत. अशातच राज्याचे लक्ष लागलेल्या आणि तिहेरी लढत होत असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चुरस दिसून येत आहेत. महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे. महायुतीचे संदीपान भुमरे आणि विद्यमान खासदार एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यात ही अटातटीची लढत पाहायला मिळत आहे.

सुरूवातीला समोर आलेल्या आकडेवारीनुसार, एमआयएमचे इम्तियाज जलील हे पहिल्या फेरी अखेर आघाडीवर दिसून आले होते. चंद्रकांत खैरे ११ हजार ४३४, संदिपान भुमरे १६ हजार ४०५ तर इम्तियाज जलील १९ हजार ७४५ अशी मते अपेक्षित होती. तर आता औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या तिसऱ्या फेरीत संदिपान भुमरे (शिवसेना - शिंदे गट) यांना २२८ मतांची आघाडी मिळाली आहे.

संदिपान भुमरे यांना - 50946 मते

इम्तियाज जलील - 50718 मते

चंद्रकांत खैरे - 35506 मते

तिसऱ्या फेरीमध्ये संदिपान भुमरे आणि इम्तियाज जलील यांच्यात काहीच मतांचं अंतर आहे तर चंद्रकांत खैरे पिछाडीवर गेले आहेत.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी एमआयटी महाविद्यालय, बीड बायपास येथे सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. त्यात कन्नड, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व, गंगापूर, वैजापूर असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतांची मोजणी करण्यासाठी १४ टेबल लावले आहेत. ७ टेबलची एक रांग अशा दोन रांगावर मतमोजणी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT