औरंगाबाद - अमरप्रीत चौकामध्ये वाहतूक व्यवस्थेत बदल सुरू केल्यामुळे काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण होत होती, तर कधी वाहतूक सुरळीत झाल्याचा अनुभव येत होता.
औरंगाबाद - अमरप्रीत चौकामध्ये वाहतूक व्यवस्थेत बदल सुरू केल्यामुळे काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण होत होती, तर कधी वाहतूक सुरळीत झाल्याचा अनुभव येत होता. 
मराठवाडा

वाहतूक पोलिसांच्या प्रयोगाने वाचले ४५ सेकंद

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - जालना रस्त्यावरील वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी काही बदल सुरू केले आहेत. अमरप्रीत चौकामध्ये सोमवारपासून (ता. ११) सुरू केलेल्या प्रयोगाने १८० सेकंदाचा वेळ (सायकल पूर्ण होण्याचा वेळ) १३५ सेकंदावर आला. आता हा प्रयोग प्रत्येक चौकात राबविण्याचा शहर पोलिसांचा विचार आहे.

जालना रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण आहे. सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक चौकामध्ये असलेल्या सिग्नलवर तीन-तीन वेळा सिग्नलमध्ये अडकल्याने वाहनधारकांचा वेळ वाया जात होता. रोज सकाळी साधारण दहा ते बारा वाजेदरम्यान आणि सायंकाळी साडेपाच ते सात वाजेदरम्यान प्रचंड वाहतूक कोंडीचा अनुभव येत होता. आतापर्यंत एकावेळी एकच सिग्नल सुटत होते. चक्राकार पद्धतीने एकानंतर एक सिग्लन सोडले जात होते. यामध्ये वाहनधारकांचा वेळ वाया जात होता. अधिक वेळ सिग्नलवर थांबावे लागत असल्याने अनेकजण सिग्नल तोडून पळत होते. त्यामुळेच प्रायोगिक तत्त्वावर जालना रस्त्यावरील अमरप्रीत चौकामध्ये वाहतुकीचे नियमन सुरू करण्यात आले.

असे केले बदल 
एका वेळी एकच सिग्नल सोडण्याऐवजी विरुद्ध दिशेने दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली. त्याच वेळी क्रांती चौकाकडून चिकलठाण्याकडे जाणारी वाहने आणि चिकलठाण्याकडून क्रांती चौकाकडे जाणारी वाहने आता एकाच वेळी सोडण्यात येत आहेत. या प्रयोगामुळे वेळेची बचत झाल्याचे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सी. डी. शेवगण यांनी सांगितले. पूर्वी एकापाठोपाठ सिग्नल सोडले जात असल्याने सायकल पूर्ण होण्यास तीन मिनिट (१८० सेकंद) वेळ लागत होता. आता एकाच वेळी समोरासमोर दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू राहणार असल्याने वेळेची बचत झाली असून, आता ४५ सेकंद वेळ कमी झाला असल्याने कमी वेळेत वाहतूक मोकळी होत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. 

जालना रस्त्यावरील वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन बदल केले आहेत. हा बदल यशस्वी झाला असून, ४५ सेकंद वाचण्यास मदत होत आहे. हाच प्रयोग दोन दिवसानंतर आकाशवाणी चौकातही सुरू करण्यात येणार आहे. 
- सी. डी. शेगवण (सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

Harshaali Malhotra: 'बजरंगी भाईजान' मधली मुन्नी आठवते? आता ओळखणंही झालंय कठीण, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात...

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

SCROLL FOR NEXT