Pravin-Togdia
Pravin-Togdia 
मराठवाडा

प्रवीण तोगडिया मराठवाड्यात

सकाळवृत्तसेवा
औरंगाबाद - बेपत्ता प्रकरणानंतर प्रथमच विश्‍व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया गुरुवारपासून (ता. 8) औरंगाबाद, परभणी दौऱ्यावर आले आहेत. त्यांना झेड प्लस सुरक्षा असून, शहर व ग्रामीण पोलिस दलातील सुमारे एक हजार पोलिसांचे सुरक्षाकवचही त्यांना राहील, अशी माहिती शहर पोलिस दलाकडून देण्यात आली. त्यांच्या कार्यक्रमस्थळी तसेच येण्या-जाण्याच्या मार्गावर चोख बंदोबस्त लावला जात आहे. ते दिल्लीहून गुरुवारी सायंकाळी विमानाने औरंगाबादेत पोचले.

शुक्रवारी सकाळी सहाला ते वेरूळ येथील घृष्णेश्‍वर तसेच भद्रामारुतीचे दर्शन करून अभिषेक करतील. त्यानंतर शनिशिंगणापूरला जातील. तेथून औरंगाबादेत दोनला परतून सव्वा चारला दिल्लीला रवाना होतील.

मुक्कामाची ठिकाणे सील
सरकारवर तोफ डागून जिवाला धोका असल्याचे वक्तव्य केल्यानंतर सावध पावित्रा म्हणून तोगडिया जिथे मुक्काम करतील तेथील ठिकाणे आधीच सील केले जातील. त्यांच्या येण्याजाण्याच्या मार्गावरही तगडा बंदोबस्त राहील, चहापानाच्या ठिकाणी खास सहायक आयुक्त सुरक्षेसाठी राहतील.

असा आहे बंदोबस्त
-पोलिस उपायुक्त : 2
-सहायक पोलिस आयुक्त : 4
-पोलिस निरीक्षक : 17
-स्ट्रायकिंग फोर्स : 3
-वाहतूक पोलिस : 300
-पोलिस कर्मचारी अधिकारी : 400
-एसपीओची विशेष सुरक्षा
याशिवाय ग्रामीण पोलिसांचा वेगळा बंदोबस्त.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dushyant Chautala"...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Latest Marathi News Live Update : मतदान कमी झाल्याची चिंता नाही - अजित पवार

SCROLL FOR NEXT