Neelam Gorhe 
मराठवाडा

इच्छाशक्‍तीच्या अभावामुळेच शेतकऱ्यांचे प्रश्‍न कायम: निलम गोऱ्हे

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : "आमची बांधीलकी शेतकऱ्यांसोबत असून, कर्जमाफीची मागणी सर्वप्रथम शिवसेनेनीच केली. त्याची अंमलबजावणी व्हावी, शेतमालास हमीभाव द्यावा, यासाठी आम्ही सभागृह व बाहेर भांडत आलो आहोत; मात्र राजकीय इच्छाशक्‍तीचा अभाव असल्यानेच शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटत नाहीत'', अशी टीका शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्‍त्या आमदार निलम गोऱ्हे यांनी केली. 

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. 13) विधान परिषद विशेषाधिकार समितीची जिल्हास्तरीय बैठक डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, ""शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर देता का जाता, असे म्हणायला आम्ही सुरवात केली. कर्जमाफी देताना ऑनलाइनच्या कचाट्यात शेतकऱ्यांना अडकवू नका, अशी आमची मागणी होती; मात्र केंद्राचे नियम दाखवत ऑनलाइनच्या फेऱ्यात अडकविल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. आता कर्जमाफीची अंमलबजावणी व्हायला हवी; मात्र त्यासाठी राजकीय इच्छाशक्‍तीचा अभाव दिसून येतो,'' असे त्या म्हणाल्या. यावर तुम्हीही सरकारमध्ये आहात, असा प्रश्‍न उपस्थित केला असता, त्या म्हणाल्या, ""आम्ही तर विविध प्रश्‍नांवर सतत ओरड करीत असतो. सामान्याच्या प्रश्‍नांवर आम्हीच तर आवाज उठवतो'', असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. 

राणेंचा विषय आमच्यासाठी नगण्य 
स्वाभिमानी पक्षाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात प्रवेश झाल्यास शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार का, या चर्चेबद्दल डॉ. गोऱ्हे यांना विचारले असता, राणेंचा विषय आमच्यासाठी नगण्य असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच विरोधी पक्षाबद्दल बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे सिंचन घोटाळ्यावर बोलत नाहीत; तर सुनील तटकरे हे भाजपचे कौतुक करतात अन्‌ शिवसेनेवर टीका करतात. असा चिमटाही त्यांनी काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT