Aurangabad ; Ramakrishna Upasana irrigation work in the final phase  
मराठवाडा

रामकृष्ण उपसा सिंचनचे काम अंतिम टप्प्यात

प्रकाश बनकर

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या बहुचर्चित रामकृष्ण गोदावरी उपसा सिंचन प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे या प्रकल्पाचे काम रखडले होते. येत्या महिनाभरात याचे काम पूर्ण होणार असल्याचे बॅंकेचे उपाध्यक्ष दामोदर नवपुते यांनी मंगळवारी (ता.19) सांगितले. 


रामकृष्ण गोदावरी उपास सिंचन प्रकल्पाच्या कामासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या माध्यमातून सरकारकडून पाच कोटी 96 लाख रुपयांच्या निधीतून हे काम करण्यात आले. यासाठीचे टेंडर काढून नवीन यंत्रसामग्री आणण्यात आली. तसेच मोटरपंप बसविण्यात आले. दरम्यान, परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर प्रकल्पात पाणी आले. यामुळे पाईप जॉइंटचे काम अडून पडले आहे. हे काम झाल्यानंतर प्रकल्पाचे काम पूर्ण होणार असल्याचे नवपुते यांनी सांगितले. 

कसा आहे प्रकल्प? 

रामकृष्ण गोदावरी संस्थेच्या माध्यमातून रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना वर्ष . ही योजना दोन वर्षे चालल्यानंतर बंद पडली. या योजनेसाठी जिल्हा बॅंकेने नाबार्डकडून कर्ज घेत शंभर कोटी रुपये भरत ही योजना आपल्या ताब्यात घेतली होती. त्यानंतर योजनेचा लिलाव करण्याचा प्रयत्न केला. पाइपलाइन विकायला काढली, तर दोन ते तीन कोटींशिवाय जास्त पैसे येणार नाही, म्हणून बॅंकेने ही योजना सुरू करण्यासाठी पुन्हा पुढाकार घेतला. पाटबंधारे विभागातर्फे पावणेसहा कोटी रुपये दुरुस्तीसाठी दिले. त्यानंतर सहकार कायद्यानुसार प्रक्रिया केली. यात बराचसा कालावधी लोटला गेला. पंप जुना झाला होता, त्यामुळे दुरुस्तीऐवजी नव्या पंपाची ऑर्डर देण्यात आली होती. त्यानंतर आता नवीन मशिनरी मागविण्यात आली. 

25 ते 30 गावांना फायदा 

रामकृष्णा गोदावरी उपसा सिंचन प्रकल्पामुळे गंगापूर आणि वैजापुरातील 25 ते 30 गावांना फायदा होणार आहे. यासह दोन हजार हेक्‍टरपेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येईल. यामुळे या योजनेचे महत्त्व ओळखून कामाला गती देण्यात आली आहे. 

""पाईपची जोडणी केल्यानंतर वीजपुरवठ्यासाठी 27 लाख रुपये महावितरण कार्यालयास देऊन प्रकल्पासाठी याची ट्रायल घेणार आहोत. त्यानंतर हा प्रकल्प सुरू होईल. आतापर्यंत 95 टक्‍के काम पूर्ण झाले आहे. महिनाभराच्या आत याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना मिळणार आहे.'' 
-दामोदार नवपुते, उपाध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बॅंक  

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

SCROLL FOR NEXT