sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : पीएम श्री योजनेंतर्गत ११ शाळा ‘हायटेक’ ; नव्या धोरणात आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब

देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू आहे. प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया (पीएम श्री) योजनेंतर्गत संपूर्ण भारतात १४ हजार पाचशे शाळा विकसित आणि श्रेणी सुधारित करण्यात येणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू आहे. प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया (पीएम श्री) योजनेंतर्गत संपूर्ण भारतात १४ हजार पाचशे शाळा विकसित आणि श्रेणी सुधारित करण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ११ शाळांचा विकास करण्यात येत आहे.

सरकारी शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता सुधारावी, यासाठी केंद्र शासनाकडून ही योजना आखण्यात आलेली आहे. पीएम श्री योजनेंतर्गत केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय तसेच इतर उपक्रमांतर्गत चालविण्यात येणारी महाविद्यालये आणि शिक्षण केंद्राचा विकास करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाकडून चालविण्यात येणाऱ्या शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा समावेश देखील करण्यात आला आहे. या पीएम श्री शाळांमध्ये आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब केला जात असून नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत शिकण्यावर अधिक भर दिला जात आहे.

या भौतिक सुविधा उपलब्ध

शाळेला स्वतःची इमारत, मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालय. पिण्याचे पाणी, हात धुण्याची सोय, वीजपुरवठा, रॅम्प. ग्रंथालय, खेळाचे मैदान आदी पायाभूत सुविधा. पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित क्षेत्रात शाळा. सर्व शिक्षकांकडे विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांनुसार ओळखपत्र. दिव्यांग मुलांना सर्व समावेशक शिक्षणासाठी विशेष प्रयत्न.

या आहेत पीएम श्री शाळा

जि. प. शाळा जळगाव फेरण, जि.प. कें. प्रा. शाळा सातारा, जि.प. शाळा माळीवडगाव ता. गंगापूर, जि.प. शाळा चिलठाण ता. कन्नड, जि.प. शाळा कसाबखेडा, ता. खुलताबाद, जि.प. शाळा जांभळी ता.पैठण, जि.प. शाळा पानवडोद बु. ता. सिल्लोड, जि.प. शाळा ठाणा ता.सोयगाव, जि.प. शाळा लासुरगाव ता. वैजापूर, मौलाना आझाद विद्यालय नगरपालिका वैजापूर, जि.प. शाळा सेलगाव ता. फुलंब्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT