file photo 
छत्रपती संभाजीनगर

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार एवढ्या कोटींची कर्जमाफी

प्रकाश बनकर

औरंगाबाद: महाविकास आघाडी सरकारतर्फे दोन लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना पीककर्ज माफीची घोषणा करण्यात आली आहे. याची प्रक्रीया युद्धपातळीवर सुरु आहे. याच कर्जमुक्‍तीत जिल्ह्यातील तीन लाख 54 हजार 721 शेतकऱ्यांना 1100 कोटी रूपयापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. 15 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना या कर्जमुक्‍तीचा लाभ मिळणार असून, यांची पहिली यादी 15 ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान प्रसिद्ध होणार असल्याची माहिती बुधवारी (ता.12) विभागीय निबंधक कार्यालयातर्फे देण्यात आली. 

जिल्हा बॅंकेच्या 1 लाख 19 हजार 721 खातेदार शेतकऱ्यांना 356 कोटीपर्यंतची कर्जमुक्ती मिळणार आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयकृतसह इतरही बॅंकांमध्ये मिळून 2 लाख 35 हजार खातेदार असून जिल्हा बॅंकसह या सर्वांना अकराशे कोटींची कर्जमुक्‍ती मिळणार आहे. महात्मा फुले कर्जमुक्ती योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जमुक्तीसाठी एक ते 28 रकान्यातील शेतकऱ्यांची माहिती संगणकावर भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

15 एप्रिलपर्यंतची लाभधारक शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध होणार आहे. ही यादी सर्व माहिती सर्व विविध सहकारी सोसायट्या, स्वस्त धान्य दुकान, बॅंकांच्या शाखांमध्ये कर्जमुक्तीच्या संदर्भातील माहिती लावली जाणार आहे. त्यामध्ये कर्जमुक्तीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नावाची यादी पाहता येणार आहे. शिवाय आक्षेप नोंदवता येणार आहे. 

पंधराशे सभासदांची आधार जोडणी नाही 

जिल्ह्यातील जिल्हा बॅंकेचे 700 तर राष्ट्रीकृत बॅंकाच्या 852 शेतकऱ्यांना त्यांच्या आधार कार्ड अजूनही बॅंक खात्याशी संलग्न केलेले नाहीत. यातील काहींना तांत्रिक अडचणी येत आहे. तर काहीचे डोळ्यांचा रेटिना, हातांचे ठसे उमटत नाही,तर काहींना लाभ मिळणार नसल्याने आधार जोडणी करण्याच टाळले आहे. आधार खात्यांशी जोडणी न करणाऱ्यांची संख्या एक हजार 552 आहेत, असेही सहकार विभागातर्फे सांगण्यात आले. 
हेही वाचा :53 आमदार,खासदारांना पाणी प्रश्‍नावरील बैठकीचे वावडे (वाचा कोण आहेत ते)...  
...तरी आधारकार्ड सक्ती 

शासकीय एखाद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड सक्ती बंधनकारक नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असतानाही अजूनही सहकारसह इतरही अनेक ठिकाणी आधारकार्डची सक्ती केली जात आहे. जिल्हा बॅंकेतील 700 शेतकरी आधारकार्डपासून अजूनही वंचित असल्याची माहिती योगीराज सुर्वे यांनी दिली असून हे शेतकरी आधारकार्ड सक्तीमुळे महात्मा फुले कर्जमुक्तीपासून वंचित राहण्याची शक्‍यता अधिक बळावली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: ''बप्पा तुम्ही भाग्यवान.. कापनीच्या वेळी आलात'' पंकजा मुंडेंकडून बजरंग सोनवणेंना चिमटा

Modi-Shivraj Singh Chouhan : मोदींना पहिल्यांदा कधी भेटले होते शिवराज सिंह चौहान? जाणून घ्या, 'ती' खास आठवण!

Digital Panvel: ‘डिजिटल पनवेल’साठी पहिले पाऊल! महापालिका कार्यालयात किओस्क यंत्रणेचा वापर

Budhwar Peth Pune: तरुण बुधवारपेठेत गेला पण पैसे देताना पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरला, तीन महिलांनी असं काही केलं की....

10-20 करोड नाही तर सिडनी स्वीनीला बॉलिवूड फिल्मसाठी ऑफर केले इतके रुपये, ती सुद्धा झाली SHOCK !

SCROLL FOR NEXT