छत्रपती संभाजीनगर

विभागात अकरावीच्या ४९ टक्के जागा रिक्त

CD
अकरावीच्या ४९ टक्के जागा रिक्त विज्ञान शाखेला सर्वाधिक प्रतिसाद, वाणिज्यच्या ७७ टक्के जागा रिक्त छत्रपती संभाजीनगर, ता. २ : विभागातील अकरावी प्रवेश प्रक्रियेत उपलब्ध जागांच्या तुलनेत आतापर्यंत निम्म्याच जागांवर प्रवेश निश्चित झाले. बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, जालना आणि परभणी या पाच जिल्ह्यांमध्ये एकूण ३ लाख २६ हजार ९२५ प्रवेशक्षम विद्यार्थीसंख्या असून, त्यापैकी १ लाख ६६ हजार १६६ प्रवेश झाले आहेत. अद्याप ४९.२ टक्के जागा रिक्त असून अकरावीत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत असल्याचे यावरून दिसते. शिक्षण विभागाने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी अकरावीसाठी उपलब्ध करून दिलेल्या जागांपैकी तब्बल १ लाख ६० हजार ७५९ जागा अद्याप रिक्त आहेत. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख २२ हजार ६८० विद्यार्थीसंख्या असून, ६० हजार ४०३ प्रवेश झाले आहेत. येथे ६२ हजार २७७ जागा रिक्त आहेत. विज्ञान शाखेत ५३ हजार १४० विद्यार्थ्यांपैकी ३६ हजार ७११ प्रवेश झाले असून, या शाखेला तुलनेने चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, कला शाखेच्या ४५ हजार २३० जागांपैकी केवळ १८ हजार २६५, तर वाणिज्य शाखेच्या २४ हजार ३१० जागांपैकी ५ हजार ४२७ प्रवेश झाले आहेत. प्राप्त एकूण आकडेवारीनुसार विभागात सुमारे ५०.८ टक्के प्रवेश झाले असून, अद्याप ४९.२ टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे आगामी प्रवेश फेऱ्यांमध्ये रिक्त जागा भरण्याचे मोठे आव्हान आहे. विशेष म्हणजे, यात वाणिज्य शाखेच्या एकूण ५४ हजार ९५० जागा असून, त्यापैकी ४२ हजार ६८७ म्हणजे सुमारे ७७ टक्के जागा रिक्त असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. ---- प्रवेशाची जिल्हानिहाय स्थिती बीड जिल्ह्यात ६४ हजार ४४० विद्यार्थ्यांपैकी ३७ हजार ६६७ प्रवेश झाले असून, २६ हजार ७७३ जागा रिक्त आहेत. यात विज्ञान शाखेत २८ हजार ८६० पैकी २१ हजार ४६८ प्रवेश झाले. जालना जिल्ह्यात ६४ हजार ६२० विद्यार्थ्यांपैकी २९ हजार ८९८ प्रवेश झाले, तर तब्बल ३४ हजार ७२२ जागा रिक्त आहेत. हिंगोलीत २६ हजार ४४५ पैकी १३ हजार ३६१, परभणीत ४८ हजार ७४० पैकी २४ हजार ८३७ प्रवेश झाले आहेत. ---- (((कोट))) - विभागात काही नवीन महाविद्यालयांची भर पडली आहे. त्यामुळे यंदा अकरावीसाठी उपलब्ध जागांची संख्या काही प्रमाणात वाढली आहे. दुसरीकडे अनेक विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेण्याऐवजी आयटीआयसह इतर तांत्रिक शिक्षण घेण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे अकरावी प्रवेशाचे प्रमाण घटले असावे. - कैलास दातखीळ, शिक्षण उपसंचालक

मुकेश अंबानींची रिलायन्स आता आईस्क्रीमही बनवणार, अवघ्या १० रुपयांत लाँच केले प्रॉडक्ट, दिग्गज कंपन्याची उडाली झोप

Gokulashtami 2026: मोरपीस ते बासरी! जन्माष्टमीआधी घरात 'या' ५ वस्तू आणणे मानले जाते अत्यंत शुभ; जाणून घ्या वास्तू नियमावली..

Nutrition Week : वजन घटवण्यासाठी फायबर इतकं महत्त्वाचं का? AIIMSच्या डॉक्टरांनी सांगितलं ‘हे’ कारण

Manwat News : मानवत नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा ७ व्या दिवशीही कामबंद लढा कायम; तोडगा न निघाल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

Mumbai Rain Update: मुंबईचं हवामान अचानक बदललं, मुसळधार पावसाची सुरुवात; कसा असेल पुढील २ दिवसाचा अंदाज?

SCROLL FOR NEXT