Education Sakal
छत्रपती संभाजीनगर

गुरुजींना वर्षभरात १२८ सुट्या, वेळापत्रक जाहीर: नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू

यात दिवाळीच्या सुट्या २८ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान असतील. १५ नोव्हेंबरला गुरुनानक जयंतीमुळे सुटी असेल.

सकाळ वृत्तसेवा

आगामी शैक्षणिक वर्षातील सुट्यांचे वेळापत्रक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जाहीर केले. त्यानुसार दोन मेपासून शाळांना उन्हाळी सुटी असून, १५ जूनला नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात होईल. सध्या निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या गुरुजींना पुढच्या सत्रात तब्बल १२८ दिवस हक्काच्या सुट्या मिळणार आहेत. याबाबतचा आदेश जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जारी केला.

प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण व माध्यमिकचे शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी नवीन शैक्षणिक वर्षातील सुट्यांचे वेळापत्रक तयार केले. त्यास सीईओ विकास मीना यांनी मंजुरी दिली. यात दिवाळीच्या सुट्या २८ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान असतील. १५ नोव्हेंबरला गुरुनानक जयंतीमुळे सुटी असेल.

त्यानंतर १६ नोव्हेंबरपासून दिवाळीनंतर शाळा सुरू होणार असल्याचेही वेळापत्रकात स्पष्ट केले आहे. शिवाय शासनाने निर्धारित केलेल्या २० सुट्या, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातील ३ आणि मुख्याध्यापक स्तरावरील २ सुट्याही असतील. ज्या शाळांना गणेशोत्सव, नाताळ, रमजान, मोहरम सारख्या सणांना सुट्या घ्यायच्या असतील, त्यांनी दिवाळीची सुटी कमी करून त्याऐवजी इतर सणांच्या तेवढ्याच कालावधीची सुटी समायोजनाने शालेय व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने जाहीर करावी.

नागपंचमी, पोळा, राजमाता जिजाऊ जयंती आदीप्रसंगी स्थानिक मागणीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने मुख्याध्यापक अधिकारातील सुटी जाहीर करण्याचा निर्णय घ्यावा, असेही आदेशात नमूद आहे. शहरासह जिल्ह्यातील सीबीएसईच्या शाळांनाही हेच वेळापत्रक लागू असणार असल्याचे शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी कळवले आहे.

कोणत्या महिन्यात किती?

मे २९

जून १७

जुलै ५

ऑगस्ट ६

सप्टेंबर ८

ऑक्टोबर १०

नोव्हेंबर १३

डिसेंबर ६

जानेवारी ४

फेब्रुवारी ६

मार्च ७

एप्रिल ७

असे आहे गणित

शिक्षकांना तब्बल ७६ सुट्या मिळणार आहेत. त्यात २० सार्वजनिक सुट्या, १० दिवस दिवाळी सुट्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातील ३ सुट्या, ४० दिवसांच्या उन्हाळी सुट्या व मुख्याध्यापकांच्या अधिकारातील ३ सुट्यांचा समावेश आहे. या शिवाय या सत्रात रविवारच्या ५२ सुट्या मिळणार आहेत. अशा एकंदर १२८ दिवस सुट्या मिळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT