Crime  Sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime : 1991 साली टाकलेल्या सशस्त्र दरोड्यातील आरोपी तब्बल 32 वर्षांनी जेरबंद

वयाच्या 21 व्या वर्षी दरोडा टाकला, 53 व्या वर्षी अटक झाली.

दत्ता लवांडे

पैठण : वयाच्या २१ व्या वर्षी दरोडा टाकलेल्या आरोपीला तब्बल ३२ वर्षांनी म्हणजे त्याच्या वयाच्या ५३ व्या वर्षी पोलिसांनी अटक केली आहे. पैठण तालुक्यातील बीडकीन पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून सदर आरोपी फरार होता.

अधिक माहितीनुसार, १५ ऑक्टोबर १९९१ रोजी बीडकीन परिसरातील गाढेगाव येथील एका शेतवस्तीवरील घरावर पाच दरोडेखोरांनी मध्यरात्री दीड वाजता सशस्त्र दरोडा टाकला होता. यावेळी त्यांनी काठ्या, कुऱ्हाडीने मारहाण करून दशहत पसरवत सोने, घड्याळ, रोख रक्कम असे मिळून सव्वातीन हजार रूपयांचा मुद्देमाल चोरला होता.

या धाडसी दरोड्यामध्ये सहभागी असलेल्या तीन जणांना पोलिसांनी तत्काळ अटक केली. यामध्ये मनोहर संपत बर्डे, अंताराम मनोहर बर्डे, ओंकार दगडू माळी या आरोपींनी अटक करण्यात पोलिसांना यश आले होते पण अशोक विनायक बर्डे आणि सुभाष बाबुराव बर्डे हे दोन आरोपी तेव्हापासून फरार होते.

मागच्या ३२ वर्षापासून अशोक हा पोलिसांना गुंगारा देत होता. तो आपल्या वास्तव्याच्या जागा आणी नावसुद्धा वारंवार बदलत होता. काही दिवसांपूर्वी गोपनीय माहितीच्या आधारे अशोक हा नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील पुणतांबा येथे एका वीटभट्टीवर काम करत असल्याची माहिती मिळाली. पण पोलीस तिथे पोहोचताच त्याने तिथूनही पोबारा केला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, त्याचं मूळ गाव असलेल्या नेवासा तालुक्यातील भालगाव येथे तो येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. यावरून पोलिसांनी सापळा रचून मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अशोकला पकडले. सध्या तो ५३ वर्षाचा असून त्याने तब्बल ३२ वर्षे पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर अखेर त्याला पोलिसांनी जेरबंद केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT