2 thousand 649 units of industries closed down in state in two years 
छत्रपती संभाजीनगर

सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगाला फटका

राज्यात दोन वर्षांत २ हजार ६४९ उद्योगांचे युनिट बंद

शेखलाल शेख

औरंगाबाद - कोरोना, लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका देशात महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना (एमएसएमई) बसला आहे. १ जुलै २०२० ते १ एप्रिल २०२२ या १ वर्ष ९ महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वाधिक २ हजार ६४९ तर देशात ९ हजार २६७ सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांचे युनिट बंद झाले. विशेष म्हणजे, १ एप्रिल २०२२ ते २० जुलै २०२२ या चार महिन्यात महाराष्ट्रात ८१५ सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगाचे युनिट बंद झाले.

देशात २०२१-२२ या वर्षात सर्वाधिक फटका

कोरोनाच्या संकटात मोठ्या उद्योगांनी स्वतःला तारले. मात्र सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग यातून लवकर सावरू शकले नाहीत. कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे लघु उद्योगांना आपला गाशा गुंडाळावा लागला. देशात १ जुलै २०२० ते ३१ मार्च २०२१ दरम्यान देशात १७५ युनिट बंद झाले. त्यानंतर आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ दरम्यान बारा महिन्यात सर्वाधिक ६ हजार २२२ तर १ एप्रिल २०२२ ते २० जुलै २०२२ या चार महिन्यातच देशात २ हजार ८७० सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगाचे युनिट बंद झाले आहे. १ जुलै २०२० ते ३१ मार्च २०२१ दरम्यान महाराष्ट्रात फक्त ३ सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगाचे युनिट बंद झाले. मात्र त्यानंतर यामध्ये मोठी वाढ झाली. युनिट बंद होत असल्याने त्याचा परिणाम रोजगारावर होत आहे.

काय आहेत सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग

उत्पादन उद्योग असल्यास यंत्रासामुग्रीसह कमाल भांडवल गुंतवणुक २५ लाख आणि सेवा उद्योग असल्यास विभिन्न उपकरणांमध्ये कमाल १० लाख भांडवल गुंतवणूक असणारे उद्योग सूक्ष्म उद्योगात मोडतात. ज्या उत्पादन उद्योगात यंत्रसामुग्रीसह मालमत्तेमध्ये कमाल ५ कोटींची भांडवली गुंतवणुक असेल आणि ज्या सेवा उद्योगातील उपकरणांमध्ये २ कोटी कमाल भांडवली गुंतवणुक असते असे उद्योग लुघ उद्योगात येतात. ज्या उत्पादन उद्योगाच्या यंत्रांवर कमाल भांडवल गुंतवणुक १० कोटी आहे तसेच ज्या सेवा उद्योगांच्या उपकरणांमधील गुंतवणुक कमाल ५ कोटी आहे असे उद्योग हे मध्यम उद्योगात मोडतात.

देशात १ जुलै २०२२ ते २० जुलैपर्यंत बंद झालेले सुक्ष्म, मध्यम, लघु युनिट

महाराष्ट्र २,६४९ गुजरात ८३२

उत्तरप्रदेश ७६२ तामिळनाड ७४०

बिहार ७१४ कर्नाटक ३९८

राजस्थान ३९० दिल्ली ३५१

पंजाब २८६ मध्यप्रदेश २७६

हरियाणा २६८ प. बंगाल २४६

केरळ २०२ आंध्रप्रदेश १७०

तेलंगाणा १४६ छत्तीसगड १००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

SCROLL FOR NEXT