शनिवारी धावल्या एसटीच्या २१ लालपरी  sakal
छत्रपती संभाजीनगर

शनिवारी धावल्या एसटीच्या २१ लालपरी

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असला तरीही दररोज काही कर्मचारी ड्युटीवर हजर

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : एसटीच्या संपाच्या अनुशंगाने शनिवारी वीस शिवशाही व २१ लालपरी रस्त्यावर धावल्या, यातून तब्बल दिड हजार प्रवाशांनी प्रवास केला. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असला तरीही दररोज काही कर्मचारी ड्युटीवर हजर होत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात बससेवा चालवली जात आहे. शनिवारी औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकातून औरंगाबाद -पुणे मार्गावर सोळा खासगी शिवशाही चालवण्यात आल्या, तर औरंगाबाद नाशिक या मार्गावर चार बस सोडण्यात आल्या होत्या.

त्याचप्रमाणे २१ लालपरीच्या माध्यमाने प्रवाशी वाहतूकही करण्यात आली. सिडको जालना मार्गावर आठ लालपरीने सोळा फेऱ्या केल्या, औरंगाबाद सिल्लोड मार्गावर चार बसने आठ फेऱ्या केल्या, औरंगाबाद आगारातून कन्नड मार्गावर एका बसने चार फेऱ्या केल्या. तर कन्नड आगारातून औरंगाबाद मार्गावर चार बसने चार फेऱ्या केल्या. सोयगाव बनोटी, सोयगाव अजिंठा दरम्यान प्रत्येकी एक बस चालवण्यात आली, गंगापूर महालगाव, गंगापूर नेवासा प्रत्येक एक बस सोडण्यात आली होती. एकूण ४१ बसद्वारे ७० फेऱ्या करण्यात आल्या, यामध्ये १५४१ प्रवाशांनी प्रवास केला.पुणे, नाशिक मार्गावर २० खासगी शिवशाही दिडहजार प्रवाशांनी घेतला लाभ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT