sambhaji nagar  Sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : सिगारेटचा झुरका पडला २८५ रुपयांत

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे भोवले, २८ जणांना दंड

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणे २८ जणांना चांगलेच भोवले. जिल्हा तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकाने कारवाई करीत गुरुवारी (ता. ७) त्यांच्याकडून ८ हजार रुपये दंड वसूल केला. एकेकाला सिगारेटचा झुरका तब्बल २८५ रुपयांत पडला.

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे आणि तंबाखूयूक्त पदार्थाची जाहिरात करण्यास, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्यानुसार मनाई आहे. यासह विक्रेत्यांना आपल्या दुकानात १८ वर्षांखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री केले जाणार नाही, असा फलक लावणेही अनिवार्य आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यास ‘प्रति कलम’ २०० पर्यंत दंडाची रुपये तरतूद आहे.

सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पानमसाला, गुटखा आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवनास, थुंकण्यास व धूम्रपान करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर पथकांमार्फत नियमित कारवाई केली जाते. या अंतर्गत गुरुवारी पथकाने शहरातील पद्मपुरा, रेल्वे स्टेशन परिसर, पंचवटी चौक या भागात ही मोहीम राबविली. कायदा मोडणाऱ्या २८ जणांवर कारवाई करत आठ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतिपवळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. अमोल काकड, योगेश सोळुंके, लक्ष्मीकांत माळगे, पोलिस अधिकारी, कर्मचारी, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी ही कारवाई केली. यासह उपस्थितांना तंबाखू, सिगारेट सेवनाच्या दुष्परिणामाबाबत माहितीही दिली.

आठ महिन्यांत ५८ हजार दंडाची वसुली

शहरातील विविध भागांमध्ये तंबाखू नियंत्रण पथकाने एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत, सार्वजनिक ठिकाणी झुरका मारणाऱ्या ३७५ जणांवर कारवाई केली आहे. यातून तब्बल ५८ हजार ४४५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy: तिलक वर्मा ९९ धावांवर आऊट अन् मग वैभव सूर्यवंशी, ईशान किशनसह पूर्व विभागानं जे केलं, त्यानं जिंकली कोट्यवधींची मनं!; Video

CSMT Redevelopment : सीएसएमटीचा ‘वर्ल्ड हेरिटेज’ दर्जा; पुनर्विकासाने मात्र रेल्वेचीच कोंडी! प्लॅटफॉर्म १६-१७ सात महिन्यांपासून बंद, आता १४-१५ ताब्यात देण्याची मागणी

Marathi News Live Updates : टीव्हीके-काँग्रेस आघाडीला नवीन नाव

MLA Manoj Kayande : सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : विद्यानंद बापट हल्ला प्रकरणातील संतोष चव्हाणचा जामीन न्यायालयाने फेटाळला

SCROLL FOR NEXT