छत्रपती संभाजीनगर

शेतकऱ्यांना अनुदान, शेतमजुरांना काय..? ३५ हजारांवर शेतमजूर कुटुंबे विशेष मदतीच्या प्रतीक्षेत

CD
३५ हजार शेतमजूर कुटुंबे मदतीच्या प्रतीक्षेत - कामे ठप्प झाल्याने रोजगाराचा प्रश्न; दिवाळीपूर्वी अनुदान देण्याची मागणी फुलंब्री, ता. १ (बातमीदार) : यंदा पावसाने ओढ दिल्याने फुलंब्री तालुक्यात दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. खरीप पिके वाळून गेल्याने शेतकऱ्यांसोबतच शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतमजुरांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतीकामे पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे हाताला काम उरलेले नाही. परिणामी, तालुक्यातील ३५ हजारांहून अधिक शेतमजूर कुटुंबे सध्या उपासमारीच्या छायेत असून शासकीय मदतीची वाट पाहत आहेत. शासनाकडून शेतकऱ्यांना पीकविमा आणि नुकसानभरपाई दिली जात असली, तरी भूमिहीन शेतमजुरांसाठी कोणतीही स्वतंत्र तरतूद नाही. खुरपणी, फवारणी आणि कापूस वेचणीसारखी कामे बंद असल्याने अनेक कुटुंबांवर उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. शासनाने दुष्काळग्रस्त शेतमजुरांचे स्वतंत्र सर्वेक्षण करून त्यांना तातडीने आर्थिक पॅकेज जाहीर करावे, रोहयो अंतर्गत गावातच हक्काचा रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि रेशनद्वारे अतिरिक्त धान्य द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. -- प्रतिक्रिया शेतकऱ्यांप्रमाणेच आम्हीही शेतीवरच पोट भरतो. दुष्काळात शेतात कामच उरले नसल्याने आमचे कुटुंब संकटात सापडले आहे. सरकारने शेतकऱ्यांप्रमाणेच शेतमजुरांचाही विचार करावा आणि दिवाळीपूर्वी विशेष आर्थिक अनुदान जाहीर करावे. - गणेश विधाटे, शेतमजूर, शेलगाव खुर्द

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा रक्तरंजित संघर्ष! दोन गटांत भीषण गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, तणाव वाढणार?

IND vs NZ: ईशान किशनने सूर्यकुमारला टाकलं मागे अन् असा पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय

Drought Crisis: टंचाईच्या स्थितीतून बळीराजाला सावरण्याचा प्रयत्न ;शरद पवार यांचा दौरा सुरु

Latest Marathi News Update : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माढा तालुक्यात केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी, शेतकऱ्यांशी साधला संवाद

IND vs NZ ODI: टी-२० मालिकेनंतर टीम इंडिया पुन्हा सज्ज! पहिला वनडे सामना कधी, कुठे अन् किती वाजता? लाईव्ह सामना टीव्ही मोबाईलवर कुठे पाहता येणार?

SCROLL FOR NEXT