crime sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद: ३६ लाखांचे दागिने पळविणारा अटकेत; पोलिसांनी अकोल्यात केली कारवाई

फिर्यादीने नववधूला डायमंड सेट गिफ्ट केला व उर्वरित दागिने देत असताना व्‍याही संजय जैस्‍वाल यांनी दागिने परत घेऊन, जा असे सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : लग्नातून तब्बल ३६ लाख ५० हजार रुपये किमतीचे दागिने ठेवलेली बॅग लंपास करणाऱ्यांपैकी एका चोरट्याला चिकलठाणा पोलिसांनी अकोल्यातून शनिवारी (ता.एक) रात्री अटक केली. त्‍याला ७ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी आर. व्‍ही. सपाटे यांनी रविवारी (ता.२) दिले आहे.

अभिषेक विनोद भानुलिया (वय २०, रा. जातखेडी, ता.पाचोर जि.राजगड, मध्‍यप्रदेश) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत प्रकरणात सुनील राधेश्‍याम जैस्‍वाल (रा. नागपूर) यांनी फिर्याद दिली. त्‍यानुसार, फिर्यादीचा मुलगा नैमीश याचे लग्न औरंगाबादेत संजय जैस्‍वाल यांच्‍या मुलीशी ठरले. ६ डिसेंबर २०२१ रोजी सूर्या लॉन्सवर हळदीचा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी फिर्यादीने नववधूला डायमंड सेट गिफ्ट केला व उर्वरित दागिने देत असताना व्‍याही संजय जैस्‍वाल यांनी दागिने परत घेऊन, जा असे सांगितले. त्‍यामुळे फिर्यादीने सर्व दागिने एका बॅगेत भरले व ती बॅग एका खुर्चीवर ठेवून ते नातेवाइकांच्या भेटी-गाठीसाठी गेले. हीच संधी साधत चोरट्याने दागिने असलेली बॅग लंपास केली. १०-१५ मिनिटांनी फिर्यादी बॅग घेण्‍यासाठी आले असता बॅग चोरीला गेल्याचे त्‍यांच्‍या निदर्शनास आले.

फिर्यादीने सीसीटीव्‍हीचे चित्रण तपासले असता, त्‍यात एक मुलगा बॅग घेऊन लॉनच्‍या बाहेर जाताना दिसला. गेटच्‍या बाहेर एक कार उभी होती, त्‍या कारमध्‍ये पूर्वीच एक व्‍यक्ती बसलेली होती. बॅग घेऊन आलेला मुलगा त्‍या कारमध्‍ये बसला आणि कार तेथून निघून गेल्याचे समोर आले. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. गुन्‍ह्याचा तपास सुरु असताना अकोला जिल्ह्यातील सिव्हिल लाईन पोलिसांनी एका चोरीच्‍या गुन्‍ह्यात आरोपी अभिषेक भानुलिया याला अटक केली असून त्‍याने साथीदारांसह अकोला, वर्धा, औरंगाबादसह इतर जिल्ह्यात देखील चोरी केल्याची कबुली दिली आहे. अशी माहिती चिकलठाणा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी भानुलिया याला ताब्यात घेत अटक केली. न्यायालयात सहायक सरकारी वकील डी. आर. काठुळे यांनी युक्तिवाद केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, Video: वैभव सूर्यवंशीची दोन सिक्ससह दणक्यात सुरुवात, पण मग कशी पडली विकेट? माघारी जाताना झाला भावूक

तुम्हीच सांगा उपवास कसा करायचा? सणासुदीच्या काळात भगरीच्या किंमतीत दुप्पटीने वाढ, साबुदाणाही महागला, पण किती?

Nagpur RTO Crackdown: नागपूरमध्ये HSRP नसलेल्या वाहनांवर RTOची धडक कारवाई; तीन दिवसांत १७२ वाहनांवर ई-चलान, १.७२ लाखांचा दंड

Melghat Teachers Scam: मेळघाटातील कंत्राटी शिक्षक भरतीत मोठा घोळ? आरटीई व संचमान्यतेला हरताळ, प्रहार संघटनेचा पारदर्शक प्रक्रियेचा आग्रह

Nagpur Education : मनपाच्या नव्या इंग्रजी शाळा अजूनही कागदावरच; आठवडा उलटला तरी प्रवेशप्रक्रिया ठप्प, पालक संभ्रमात

SCROLL FOR NEXT