Ghati Hospital  sakal
छत्रपती संभाजीनगर

Ghati Hospital : घाटीत हवे ३८४ सुरक्षारक्षक,सध्या १५४; सुरक्षा ऑडिटमध्ये पोलिसांचा सल्ला

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) सोमवारी (ता. १७) रुग्ण, नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यात झालेल्या प्रकरणानंतर घाटीतील डॉक्टर आणि रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) सोमवारी (ता. १७) रुग्ण, नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यात झालेल्या प्रकरणानंतर घाटीतील डॉक्टर आणि रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. विशेष म्हणजे पोलिसांनी केलेल्या सुरक्षा ऑडिटमध्ये घाटीत ३८४ सुरक्षारक्षकांची गरज आहे. परंतु, सध्या केवळ १५४ सुरक्षारक्षक असल्याने सुरक्षा तोकडी पडत असल्याचे दिसते.

घाटीतील अपघात विभागात दोन गटांत राडा होऊन यात रुग्णालयातील महिला डॉक्टरलादेखील मार लागल्याची घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती. निवासी डॉक्टरांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली. परंतु, ही सुरक्षा वाढवण्यासाठी ऑडिटचा रिपोर्ट आवश्यक असतो. यामुळे प्रशासनाने घाटीच्या सुरक्षेचे ऑडिट करण्यासाठी पोलिस आयुक्तांना पत्र दिले होते.

नुकताच हा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला. त्यात मागील पंधरा दिवसांत दोन वेळा झालेल्या वादाच्या घटनेमुळे घाटीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी केवळ १५४ सुरक्षारक्षक आहेत. ही संख्या तोकडी असून, आणखी २३० सुरक्षारक्षक हवेत, असे पोलिसांच्या अहवालात म्हटले आहे.

आणखी ४० नवे पॉइंट हवे

या ऑडिटमध्ये घाटी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने किती सुरक्षारक्षक असायला हवे, यासह सुरक्षा पॉइंटबाबतही टिप्पणी करण्यात आली आहे. यात घाटीत सध्या ४५ सुरक्षा पॉइंट असून, प्रत्यक्षात ८५ पॉइंटची आवश्यकता आहे. म्हणजेच आणखी नवीन ४० पॉइंट तयार करावे लागतील.

रुग्ण, नातेवाइकांशी व्यवस्थित बोलावे

घाटीतील सुरक्षा समितीची बैठकही घेण्यात आली. यात सुरक्षा व्यवस्थेत काय बदल करावे यावर चर्चा झाली. दुसरीकडे अधिष्ठता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी कॉलेज कौन्सिलची बैठक घेत, डॉक्टरांनी रुग्ण आणि नातेवाइकांशी शांततेने व्यवस्थित बोलावे. यामुळे वादाच्या घटना होणार नाहीत, अशा सूचना त्यांनी केल्या.

अहवालात हेदेखील नमूद

  • वॉर्ड निहाय सुरक्षारक्षक हवेत.

  • ट्रॉमा, आयसीयू ,अपघात विभागात दोन पेक्षा अधिक सुरक्षारक्षक असावेत.

  • काही संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवण्याची गरज.

  • पॉइंट वाढल्याने सर्वत्र नजर ठेवणे शक्य.

‘त्या’ तरुणाविरोधात गुन्ह्याची नोंद

‘रुग्णाला झोपेचे इंजेक्शन द्या’, असे म्हणत डॉक्टरशी वाद घालून त्यांना मारहाण केल्याची घटना सोमवारी (ता. १७) दुपारी पावणेदोनच्या सुमारास घाटी रुग्णालयात घडली होती. याप्रकरणी प्रीयेश सुरेश संगवी (वय २५, रा. नर्सिंग होम, घाटी परिसर) यांच्या तक्रारीवरून अरबाज नावाच्या तरुणाविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. शेख अखिल शेख नासेर याला उपचारासाठी घाटीतील वॉर्ड क्रमांक १९ मध्ये दाखल करण्यात आले होते. वॉर्डात डॉ. संगवी हे नीलेश शिरसाठ या रुग्णावर उपचार करीत होत. त्यावेळी शेख अखिलचा नातेवाईक अरबाज त्यांच्याकडे आला आणि आमच्या रुग्णाला झोपेचे इंजेक्शन द्या, अशी मागणी करू लागला. त्याला समजावून सांगितल्यावरही तो ऐकेना. अखेर त्याने डॉ. संगवी यांना शिवीगाळ करीत मारहाण केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Drone Delivery Service: दूध, किराणा, पॅकेजेस… सगळं थेट ड्रोनने घरी पोहोचणार! मुंबईत पहिली निवासी ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू होणार, पण कधी?

SCROLL FOR NEXT