Aurangabad Aurangabad
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत भीक मागण्यासाठी चिमुकलीचे अपहरण!

११ ऑगस्टला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुलगी घरासमोर खेळत होती. त्यानंतर ती दिसून आली नाही

मनोज साखरे

११ ऑगस्टला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुलगी घरासमोर खेळत होती. त्यानंतर ती दिसून आली नाही

औरंगाबाद: भीक मागण्यासाठी चितेगाव येथील एका चार वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याचा प्रकार गुरुवारी (ता. १२) घडला. यानंतर पोलिसांनी जोरदार तपास करुन औरंगाबादेतील मुख्य रेल्वेस्थानक परिसरातून एका महिलेच्या ताब्यातून शुक्रवारी (ता. १३) सुखरुप सुटका केली. या संशयित महिलेला अटक करण्यात आली असून भिक मागण्यासाठी मुलीचे अपहरण झाल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, जानवी अनिलकुमार कुसवाह (रा. चिपळुन, जि. रत्नागिरी) असे संशयित महिलेचे नाव आहे. सुटका झालेली चार वर्षीय मुलगी मुळ उत्तर प्रदेशातील कोपागंज येथील आहे. सध्या ती चांदणी चौक येथे राहते. ११ ऑगस्टला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुलगी घरासमोर खेळत होती. त्यानंतर ती दिसून आली नाही. तिचे अपहरण झाल्याचा संशय कुटुंबियांना आला. त्यांनी बीडकीन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यात अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद झाली. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध सुरु केला.

मुलगी केवळ चार वर्षांची व ती मुळ उत्तर प्रदेशची असल्याने तिला स्पष्ट मराठी बोलता येत नव्हते. तिच्या आईशिवाय तिला कुणीही पाहिलेले नव्हते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजही पाहिले परंतु उपयोग झाला नाही. सोशल मिडियाद्वारे तसेच भोंग्याद्वारे परिसरात या मुलीच्या अपहरणाबाबत माहिती प्रसारित करण्यात आली त्यानंतर मुलगी भीक मागणाऱ्या महिलांकडे असू शकते अशी माहिती समोर आली. या शक्यतेवरुन पोलिसांनी सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी व भीक मागणाऱ्या व्यक्तींच्या निवाऱ्याच्या ठिकाणी शोध घेतला.

रेल्वेस्थानक भागात एका महिलेकडे अपहृत मुलगी दिसून आली. पोलिसांनी तिची सुटका करुन मुलीला आईच्या स्वाधीन केले. या प्रकरणी संशयित महिलेला ताब्यात घेत अटक करण्यात आली. भीक मागण्यासाठी मुलीला पळवल्याची संशयित महिलेने कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई बिडकीन पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने, उपनिरीक्षक सुधाकर चव्हाण, दिलीप साळवे, नरेश म्हस्के, सोनाली कुंदे, कृष आधाट, राहूल गायकवाड, विनायक आडे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT