Aurangabad Aurangabad
छत्रपती संभाजीनगर

४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन होणार औरंगाबादेत

आता ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन २५ व २६ सप्टेंबर २०१९ रोजी औरंगाबाद येथे आयोजित करण्याचे ठरले आहे

प्रमोद सरवळे

आता ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन २५ व २६ सप्टेंबर २०२१ रोजी औरंगाबाद येथे आयोजित करण्याचे ठरले आहे

औरंगाबाद: मागील वर्षी ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन देगलूर येथे घेण्याचे ठरले होते. परंतु कोरोनाच्या प्रभावामुळे ते स्थगित करावे लागले होते. बराच काळ वाट पाहून अखेर ते रद्द करण्यात आले होते. आता ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन २५ व २६ सप्टेंबर २०२१ रोजी औरंगाबाद येथे आयोजित करण्याचे ठरले आहे. मराठवाड्यातील साहित्यप्रेमी तरुण प्राध्यापकांनी एकत्र येऊन लोकसंवाद फाउंडेशन या त्यांच्या संस्थेच्या वतीने या संमेलनासाठी निमंत्रण दिले होते.

त्यांचे हे निमंत्रण मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत स्वीकारण्यात आले. काल साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील व इतर पदाधिकाऱ्यांशी लोकसंवाद फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेश करपे त्यांचे सहकारी डॉ. राम चव्हाण, डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ. गणेश मोहिते, डॉ. हंसराज जाधव, डॉ. रविकुमार सावंत, जिजा शिंदे, आणि राम शिनगारे यांनी संमेलनाच्या आयोजनासंबंधी समक्ष चर्चा केली.

आज मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी या संमेलनाची घोषणा करताना संमेलनाच्या आयोजनाची माहिती दिली. यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष किरण सगर, कार्यवाह दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे आणि कार्यकारिणीचे सदस्य डॉक्टर रामचंद्र काळुंके उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT