Sambhaji Nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : ऐन उन्हाळ्यात शहरावर नवे संकट ; नवी पाइपलाइन धुण्यासाठी लागणार ५० लाख लिटर पाणी

शहराला पाणीटंचाईतून तात्पुरता दिलासा देण्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान ९०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. या जलवाहिनीची चाचणी घेतली जात असून, त्यानंतर जलवाहिनी धुण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहराला पाणीटंचाईतून तात्पुरता दिलासा देण्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान ९०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. या जलवाहिनीची चाचणी घेतली जात असून, त्यानंतर जलवाहिनी धुण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल पन्नास लाख लिटर पाणी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याला फटका बसणार आहे.

शहरासाठी शासनाने मंजूर केलेल्या २७४० कोटी रुपयांतून २५०० मिलिमीटर व्यासाच्या पाणी योजनेचे काम सुरू आहे. मात्र, ही योजना पूर्ण होण्यासाठी वेळ लागणार आहे. तोपर्यंत शहराला पाणीटंचाईतून थोडासा दिलासा मिळावा यासाठी जुन्या ७०० मिलिमीटर व्यासाच्या पाणी योजनेचे पुनरुज्जीवन करून त्याजागी ९०० मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. हे कामदेखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर चाचणी घेतली जात आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर सुरवातीला रोज २५ एमएलडी तर चार हजार अश्‍वशक्तीचे पंप बसल्यानंतर रोज ७५ एमएलडी पाणी वाढणार असल्याचा दावा केला जात आहे.

फारोळ्यात आले होते गढूळ पाणी

या योजनेची टप्प्या-टप्प्याने चाचणी घेतली जात आहे. पहिल्या टप्प्यात फोरोळा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत चाचणी घेण्यात आली. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर गढूळ पाणी जलशुद्धीकरण केंद्रात आले. हे पाणी शुद्ध करण्यासाठी महापालिकेला केमिकलची मात्रा वाढवावी लागली. पण, नक्षत्रवाडीर्यंतच्या चाचणीनंतर पाइपलाइन धुण्यासाठी वापरले जाणारे पाणी नाल्यात सोडून द्यावे लागणार आहे.

या योजनेतून शहरासाठी पाणीपुरवठा सुरू करण्यापूर्वी जलवाहिनी पूर्णपणे धुतली जाणार आहे. जलवाहिनी धुण्यासाठी किमान पन्नास लाख लिटर पाणी लागेल. जलवाहिनी स्वच्छ केल्याशिवाय शहरवासीयांना योजनेतून पाणी पुरवठा करणे शक्य नाही.

— दीपक कोळी,

कार्यकारी अभियंता, जीवन प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT