Chh. Sambhajinagar Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhajinagar : अल्पसंख्याकबहुल भागातील ‘आयटीआय’साठी सहा कोटी; मुंबईत दोन नव्या संस्थांना मान्यता

चालू शैक्षणिक वर्षासाठी विद्यमान औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दुसरी व तिसरी पाळी सुरू करण्यासाठी हा निधी राहील.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी ४२ विद्यमान शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू केल्या आहेत. या संस्थांना आणि मुंबईतील मांडवी, चांदिवली (पवई) येथे नव्याने सुरू होणाऱ्या दोन नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी सहा कोटी ३७ लाख ८५ हजार रुपये मंजूर केले आहेत.

चालू शैक्षणिक वर्षासाठी विद्यमान औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दुसरी व तिसरी पाळी सुरू करण्यासाठी हा निधी राहील. राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ४२ अल्पसंख्याक बहुल भागातील विद्यमान औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या पाळीत २४८ तुकड्या त्याचप्रमाणे मुंबईतील मांडवी व चांदिवली येथे नव्याने सुरू होणाऱ्या दोन नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये २८ तुकड्या सुरू करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. त्यासाठी शासनाने अर्थसंकल्पीय तरतूद केलेली आहे.

विद्यार्थ्यांना होणार फायदा

राज्यातील ४२ ‘आयटीआय’मध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या अभ्यासक्रमासाठी संधी मिळत आहे. त्यांच्यासाठी नोकरी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत मिळत आहे. तसेच यासाठी निधी मिळाल्याने राज्यभरातील अल्पसंख्याक बहुल भागातील ‘आयटीआय’मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament canteen: संसदेच्या कँटीनमध्ये किती रुपयांना मिळतं जेवण? विविध पदार्थांचे दर काय? व्हेज-नॉनव्हेज थाळ्यांच्याही किंमती वाढल्या

Airport Rules: प्रवाशांना दिलासा! विमानतळावरील अतिरिक्त शुल्कांवर सरकारचा मोठा निर्णय; नियम लवकरच बदलणार?

Mumbai News: जुहू समुद्रकिनाऱ्यावर यांत्रिक जाळी, सागरी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय

Latest Marathi News Live Update : खड्डे अपघातात जीव गमावलेल्या निलेश कोतकर यांच्या कुटुंबियांचं महापौरांनी केलं सांत्वन

Pachod News : नांदरमध्ये २८ वर्षीय तरुण शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली; परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT