Aurangabad muncipal corporation sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : आरोग्य विभागात भरणार ६० जागा

२० जुलैपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - महापालिकेतर्फे आरोग्य विभागात सुधारणा केली जात असून, त्यासाठी कंत्राटी पद्धतीने डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांची ६० पदे भरली जाणार आहेत. आरोग्य उपसंचालक कार्यालयात (महावीर चौक) येथे २० जुलैपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

महापालिकेतर्फे शहराच्या विविध भागात आरोग्य केंद्र चालविले जातात. या आरोग्य केंद्रामार्फत शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या लसी, विविध उपक्रम राबविले जातात. असे असले तरी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मेल्ट्रॉन येथे रुग्णांवर छोट्या शस्त्रक्रियांसह उपचार करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी शस्त्रक्रियागृह उभारण्यात आले आहे.

मेल्ट्रानमध्येच मराठवाडास्तरीय साथ रोग नियंत्रण हॉस्पिटल सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बारा ठिकाणी आरोग्य केंद्र सुरू केले जात आहेत. पाच आरोग्य केंद्र हे मल्टी स्पेशालिटी म्हणून सुरू होणार आहेत. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.

प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या सूचनेनुसार आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने ६० पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुकांनी महावीर चौकातील आरोग्य उपसंचालक कार्यालयात सहा पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने २० जुलैपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. विविध पदांसाठी १७ हजार ते ६० हजार रुपयापर्यंत मानधन दिले जाणार आहे.

या पदांची होणार भरती

  • पूर्णवेळ वै. अधिकारी २

  • अर्धवेळ वै. अधिकारी ५

  • स्टाफ नर्स ६

  • एएनएम ४१

  • औषध निर्माता ३

  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ ३

  • एकूण ६०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Dattatraya Meghe Passes Away: लोकसेवेचा वटवृक्ष निमाला! माजी खासदार, लोकनेते दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, विविध क्षेत्रात हाेता दबदबा..

Pune Accident: पुण्यातील मुथाळणे घाटात शेतमजूरांची पिकअप पलटली; एक गंभीर तर १८ किरकोळ जखमी!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT