Jalna sakal
छत्रपती संभाजीनगर

Jalna News : अकरा महिन्यांत ६२ शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

जिल्ह्यातील विदारक चित्र : समस्यांकडे वेळीच लक्ष देण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा

जालना : जिल्ह्यासह राज्यात विविध समाजाच्या आंदोलनांची धग तीव्र झाली आहे. मात्र, दुसरीकडे जगाचा पोशिंदा असलेल्या सर्व समाजातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसंदर्भात सर्वांनीच तोंडावर बोट ठेवले आहे. २०२१ ते २०२३ दरम्यान जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी, गारपिटी आणि अवकाळी पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई आज हजारो शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

कर्जाचा बोजा शेतकऱ्यांवर आहे. परिणामी आर्थिक संकटात सापडलेले अनेक शेतकरी मरण जवळ करीत आहेत. गत महिन्यात जिल्ह्यात तब्बल सहा शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळे. तर मागील अकरा महिन्यांत तब्बल ६२ कुटुंबाचा आधार असलेल्या शेतकऱ्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सरकारला कोण जाब विचारणा? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

अतिवृष्टी, अवकाळी, गारपिटी, अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेला दुष्काळ अशा विविध नैसर्गिक संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. या निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेकदा हातातोंडाशी आलेले पीक वाया जाते. परिणामी बँक आणि सावकाराच्या कर्ज फेडीच्या विवंचनेतून अनेक शेतकरी मरणाला जवळ करतात. त्यात मराठवाड्यातील जालना हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो.

मात्र, मागील वर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. सन २०२१ व २०२२ मध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. शिवाय सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टी झाली. मार्च, एप्रिल महिन्यात गारपीट, अवकाळी पाऊस झाला. यामुळे खरीप पिकांसह फळ पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाकडे दुप्पट मदतीची घोषणा केली. मात्र, आजही जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या शेकडो कोटींच्या मदतीची प्रतीक्षा आहे.

या आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांकडून टोकाचे पाऊल उचलून जीवन संपविले जात आहे. या नापिकासह कर्जाला कंटाळून मागील महिन्यात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर मागील अकरा महिन्यांत ६२ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे.

या ६२ पैकी ४२ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला राज्य शासनाने प्रत्येकी एक लाखांची आर्थिक मदत दिली आहे. मात्र, शेतकऱ्यांना मृत्यूनंतर आर्थिक मदतीपेक्षा जगण्यासाठी हक्काचे पैसे वेळेत मिळणे अपेक्षित आहे. मात्र, यासंदर्भात राजकीय नेत्यांसह शेतकरी संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांनी तोंडावर बोट ठेवल्याचे विदारक चित्र आहे.

२०२३ या वर्षात आतापर्यंत झालेल्या शेतकरी आत्महत्या

महिना आत्महत्या पात्र अपात्र आर्थिक मदत वाटप

  • जानेवारी ०४ ०४ ०० ४,००,०००

  • फेब्रुवारी ०७ ०६ ०० ६,००,०००

  • मार्च ०४ ०४ ०० ४,००,०००

  • एप्रिल ०७ ०५ ०१ ५,००,०००

  • मे ०३ ०३ ०० ३,००,०००

  • जून ०२ ०२ ०० २,००,०००

  • जुलै ०९ ०८ ०० ८,००,०००

  • ऑगस्ट १४ १० ०४ १०,००,०००

  • सप्टेंबर ०१ ०० ०० ००

  • ऑक्टोबर ०५ ०० ०० ००

  • नोव्हेंबर ०६ ०० ०० ००

  • एकूण ६२ ४२ ०५ ४२,००,०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma ला हटवून शुभमन गिलला वनडे संघाचा कर्णधार का केलं? अजित आगरकरने खरं कारण सांगितलं

TRPमध्ये मोठी उलथापालथ! दुसऱ्या स्थानावर घसरण्यापासून थोडक्यात वाचली सायली; टॉप १० मध्ये नव्या मालिकेची एंट्री; वाचा रिपोर्ट

Chandrakant Patil : संध्याकाळपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होणार, चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या आदीच केली घोषणा

Nashik News : सिडकोत 'बॅनर हटाव' मोहीम! नवीन नाशिक महापालिकेची धडक कारवाई; शहराचे विद्रूपीकरण थांबवण्यास सुरुवात

Nagpur Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी न्यायालयीन सुनावणीनंतर तुरुंगात

SCROLL FOR NEXT