sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट अन् मागणी ८२१ कोटींची

तिजोरीत खडखडाट असताना एवढी रक्कम द्यायची कुठून असा प्रश्‍न अधिकाऱ्यांना पडला आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या नव्या २७४० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी आतापर्यंत झालेल्या कामापोटी ८२१ कोटी रुपयांची मागणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने महापालिकेकडे केली आहे. या योजनेतील महापालिकेच्या हिश्श्‍याचा ८२२ कोटी रुपयांच्या निधीचा निर्णय अद्याप झाला नाही. त्यात प्राधिकरणाने भलीमोठी रक्कम मागितल्याने प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. तिजोरीत खडखडाट असताना एवढी रक्कम द्यायची कुठून असा प्रश्‍न अधिकाऱ्यांना पडला आहे.

शहरासाठी २,७४० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जात असून, केंद्र शासनाच्या अमृत-२ मध्ये योजना टाकण्यात आली आहे. त्यात केंद्र शासनाचा ३० टक्के, राज्य शासनाचा ४५ टक्के व महापालिकेचा ३० टक्के निधीचा राहणार आहे. त्यानुसार केंद्र व राज्य शासनामार्फत महापालिकेला ९८१ कोटींचा निधी प्राप्त झाला.

हा संपूर्ण निधी महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सुपूर्द केला. दरम्यान, याच योजनेत जुन्या ७०० मिलिमीटर व्यासाच्या योजनेच्या पुनरुज्जीवनाच्या कामाचा समावेश असून, त्यासाठी सुमारे २०० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. हे काम अंतिम टप्प्यात आले असल्याने कंत्राटदारांनी बिले सादर केली आहेत. त्यासोबतच नव्या पाणी पुरवठा योजनेच्या कंत्राटदाराचेही बिल थकीत आहेत.

काम रखडण्याची भीती

महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने योजनेतील महापालिकेचा हिस्सा ८२२ कोटी रुपये शासनाने भरावेत, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. उच्च न्यायालयानेदेखील यासंदर्भात निर्देश दिले आहेत. पण, राज्य शासनाने ही रक्कम महापालिकेनेच भरावी, असे पत्र दिले. या पत्रानंतर महापालिकेने पुन्हा विनंती केली आहे. त्यासोबत आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तर संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. त्यावर निर्णय झालेला नसल्याने जीवन प्राधिकरणाने ८२१ कोटी रुपयांची मागणी महापालिकेकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! विमानतळावरून १५ नवीन विमानांची उड्डाणे; कुठे आणि कधीपासून? जाणून घ्या...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Water Supply News : शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सुरळीत राहणार

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

SCROLL FOR NEXT