sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : अजिंठा घाटात मालट्रक उलटला

वाहनचालकांचे हाल; ट्रकचालक जखमी

सकाळ वृत्तसेवा

फर्दापूर : जगप्रसिद्ध अजिंठा घाटात अपघाताचे व रहदारी विस्कळीत होण्याचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी (ता.१२) सकाळी १० वाजेच्या सुमारास लोखंडी सळई घेऊन घाट उतरणाऱ्या मालट्रक (एमपी. ०९ एचजी २१७०) चे ब्रेक निकामी झाल्याने घाटातच उलटला. त्यामुळे अजिंठा घाटात दिवसभर दुतर्फा लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आले.

जालन्याहून लोखंडी सळई घेऊन मालट्रक हा छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गाने शुक्रवारी जात होता. अजिंठा घाटातील वळणावर मालट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने तो उलटला. यात चालक रफिक खान याचे पाय फॅक्चर झाले. तर वाहक (क्लिनर) यासीन खान हा सुरक्षित आहे. हा मालट्रक महामार्गावर उलटल्याने जळगावहून छत्रपती संभाजीनगरकडे व छत्रपती संभाजीनगरहून जळगावकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे दोन्ही बाजूने लांबलचक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

ब्रेक निकामी..

रविवारी ब्रेक निकामी झाल्याने पुणे-यावल या बसचा सुद्धा अपघात झाला होता. चालकाने राखलेल्या प्रसंगावधाने बस मधील ५५ प्रवाशी व समोर उभ्या असलेल्या पर्यटकांची वाहने बचावले होते.या घटनेची पुनरावृत्ती शुक्रवारी मालट्रक अपघाने अजिंठा घाटात घडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT