Wathar Police esakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Crime News : विवाहितेच्या छळप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा

सासरच्या ९ जणांविरोधात कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात, विवाहितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

कन्नड : माहेराहून सोने आणण्याची मागणी करत विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या सासरच्या ९ जणांविरोधात कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात, विवाहितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कन्नड ग्रामीण पोलिसांनी सांगितले की, वैशाली मनोज कासार, वय (२७,रा.नैताळे ता.निफाड जि. नाशिक ह.मु.चिकलठाण ता.कन्नड) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले की, ९ फेब्रुवारी २०१५ रोजी नैताळे येथील मनोज कासार यांच्यासोबत विवाह पार पडला.

लग्नानंतर सासरच्यांनी एक वर्ष चांगले वागविले यानंतर, माहेराहून सोने घेऊन ये असे म्हणत वेगवेगळ्या कारणांनी ९ फेब्रुवारी २०१५ च्या एक वर्षापासून आजपर्यंत सासरी नैताळे येथील घरी मनोज सुभाष कासार, जनार्दन कचरू कासार, प्रमिला सुभाष कासार सर्व (रा.नैताळे), लता सुनील आदमे, ननंद छाया संतोष आदमे, संतोष फकीरराव आदमे (रा.सोनेवाडी ता.सिन्नर), सोनाली राजेंद्र थोटे, शीला मनोहर थोटे, शीतल राम पांदे या सर्वांनी संगनमताने शारीरिक व मानसिक छळ केला.

तसेच वेळोवेळी उपाशी ठेवले, शिवीगाळ करत, चापट-बुक्क्याने मारहाण करून, जिवे मारण्याची धमकीदिली.विवाहितेच्या या तक्रारीवरून कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात वरील ९ लोकांविरुद्ध कलम ४९८ (अ ),३२३, ५०४, ५०६ (३४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक तात्याराव भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल एस. बी. बोराडे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सचिन तेंडुलकरने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्थ केले, टेंशन दिले"; Kapil Dev असे का म्हणाले? विराट कोहलीबद्दलही विधान...

Share Market: शेअर मार्केट Crash मध्येही हे 10 शेअर्स ठरले धुरंधर! आठवड्यात 40% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का?

'ठरलं तर मग'च्या सुमन काकूंना खऱ्या आयुष्यात आहे 'हा' गंभीर आजार; म्हणाल्या- दिग्दर्शकाने हाक मारली तरी...

Latest Marathi News Live Update : अमेरिका-इराण युद्धामुळे निर्यात होणाऱ्या केळी, द्राक्ष, डाळींबाचे मोठे नुकसान

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT