jalna sakal
छत्रपती संभाजीनगर

Jalna News : महामंडळ मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही

दीपक रणनवरे : ब्राह्मण समाजाच्या लाक्षणिक उपोषणास मोठा प्रतिसाद

सकाळ डिजिटल टीम

जालना : ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी ब्राह्मण समाजसेवक दीपक रणनवरे मागील सहा दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या मागणी संदर्भात राज्य शासनाकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. त्यामुळे महामंडळ मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी भूमिका उपोषणकर्ते दीपक रणनवरे यांनी घेतली आहे.

परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे. रविवारी (ता. तीन) गांधी चमन येथे दीपक रणनवरे यांच्या सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला ब्राह्मण समाजाने पाठिंबा म्हणून सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण करण्यात आले. अनेक समाज बांधव या लाक्षणिक उपोषणात सहभागी झाले होते.

या बेमुदत उपोषणास मागील सहा दिवसांत विविध मंत्र्यांसह राजकीय नेते, विविध समाज संघटनांनी भेटी दिल्या आहेत. मात्र, राज्य शासनाकडून उपोषणकर्ते रणनवरे यांना ठोस आश्वासन मिळालेले नाही. दरम्यान रविवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, शहरप्रमुख बाला परदेशी, शिवसेनेचे (शिंदे गट) शहरप्रमुख विष्णू पाचफुले, भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर आदींनी भेटी देऊन रणनवरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करून पाठिंबा दर्शविला.

रणनवरेंना अशक्तपणा

उपोषणकर्ते दीपक रणनवरे यांच्या बेमुदत उपोषणाचा रविवारी (ता. तीन) सहावा दिवस होता. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना अशक्तपणा आला असून, प्रतिकार शक्ती कमी होत चालली आहे.

नेत्यांकडून विचारपूस

जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी रविवारी दुपारी उपोषणकर्ते दीपक रणनवरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनद्वारे संवाद साधून देण्याचे आश्वासन दिले. यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंत्री सुधीर मुनगुंटीवार आदींनी दूरध्वनीवरून उपोषणकर्ते रणनवरे यांच्याशी संवाद साधून विचारपूस केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT