sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Crime : पोलिसांच्या सर्च मोहिमेमुळे वाचला बहीण-भावाचा जीव

सिडकोत रात्रीच्या वेळी थरार ;अट्टल गुन्हेगार नवरा जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : पत्नी आपल्याला सोडून भावाच्या घरी राहण्यास गेली. यामुळे संतापलेल्या गुन्हेगार पतीने मद्यधुंद अवस्थेत साथीदारासह तलवार घेऊन मेहुण्याचे घर गाठले. मेहुण्याने तत्काळ पोलिसांना फोन केल्याने सिडकोच्या सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा वायदंडे यांनी एन ६ परिसर गाठला. पोलिसांना पाहून पसार झालेल्या संशयिताला तलवारीसहीत जेरबंद केल्याने पुढील अनर्थ टळला. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता हा थरार घडला.

एन ६ परिसरातील यशवंतराव चव्हाण हायस्कूलजवळ मोहम्मद मजहर हा तरुण राहतो. मजहरच्या बहिणीचा विवाह शेख उमेर शेख आरेफ (३१, रा. कटकटगेट) याच्यासोबत झाला आहे. उमेर हा कुख्यात गुन्हेगार आहे. घरगुती वादातून उमेरची पत्नी काही दिवसांपासून भावाच्या घरी राहते. यामुळे मंगळवारी रात्री उमेर धारदार तलवार घेऊन १७ वर्षाच्या साथीदारासह मद्यधुंद अवस्थेत मजहरच्या घरी आला.

मजहर, पत्नीला त्याने शिवीगाळ सुरू करत ठार मारण्याची धमकी देत बाहेर येण्याविषयी धमकावले. मजहरने तातडीने ‘डायल ११२’ ला कॉल करत माहिती दिली. यावेळी गस्तीवरील पोलिस कॉन्स्टेबल म्हस्के आणि भोंडे यांनी तत्काळ ही माहिती नाईट राउंडवरील श्रद्धा वायदंडे यांना दिली. त्यांनी दादाराव म्हस्के, नरेश भोंडे, अनिल सोमवंशी आणि भगवान बोरमाळे यांना घेऊन घटनास्थळी गेल्या. पण पोलिसांना पाहताच दोन्ही संशयित अंधारात पळून गेले.

गल्लीबोळात घेतला शोध

आरोपी सराईत असल्याने तसेच त्याच्याकडे शस्त्र असल्याने तो पुन्हा येऊन हल्ला करण्याची दाट शक्यता होती. यामुळे वायदंडे यांनी अर्धा तास एन ६ च्या गल्लीबोळात आरोपींचा शोध घेतला. अखेर अंधारात लपून बसलेला आरोपी उमेर पोलिसांच्या नजरेस पडला. त्याला तत्काळ जेरबंद करून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल.

आरोपी शेख उमेर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर सिडको पोलिस ठाण्यात तीन गुन्हे तसेच सिटीचौक आणि जिन्सी पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

— श्रध्दा वायदंडे,

सहायक पोलिस निरीक्षक, सिडको पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT