छत्रपती संभाजीनगर

आधार प्रमाणीकरणासाठी तिसरी यादी प्रसिद्ध

CD
आधार प्रमाणीकरणासाठी तिसरी यादी प्रसिद्ध ------------- -पात्र शेतकऱ्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. १५ ः राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत परभणी जिल्ह्यातील २९ हजार ५९४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. संबंधित पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण व जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) विकास जगदाळे यांच्यामार्फत करण्यात आले आहे. राज्य शासनाने २ जून रोजी सदर योजना जाहीर केली. योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, त्यासाठी शासनाने महाआयटीची नियुक्ती केली आहे. महाआयटीने तयार केलेल्या पोर्टलवर परभणी जिल्ह्यातील बँकांनी एकूण १ लाख ६० हजार ७६९ थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे. या माहितीच्या संगणकीय प्रक्रियेनंतर पात्र लाभार्थींची पहिली यादी २४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत ७९ हजार ८५५ शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या यादीत २४ हजार ३७४ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला. आता १३ ऑक्टोबर रोजी तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यात आणखी २९ हजार ५९४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. आधार प्रमाणीकरणासाठी तीनही याद्यांतील संख्या विचारात घेता, एकूण १ लाख ३३ हजार ८२३ एवढी शेतकरी संख्या आहे. --- प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळविण्याच्या दृष्टीने आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया महत्त्वाची आहे. त्यामुळे यादीत नाव असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखा किंवा सहकारी संस्थेशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाना पाटेकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशीच फार्महाऊस का बांधलं? पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण, म्हणालेले- इथून महाराजांचे...

Akola District Drought : दुष्काळाच्या झळा; लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात! पाणी आणि चाऱ्याअभावी पशुपालक हवालदिल; म्हशी विकण्याची वेळ

Latest Marathi News Update : मसाल्यांमध्ये रंगांचा वापर चालणार नाही- तुकाराम मुंढे

Indian Army Alert: भारतात घुसण्यासाठी 500 दहशवादी रेडी! 'पीओके'मध्ये लपून बसल्याची माहिती; लष्कराकडे महत्त्वाचे इनपुट्स

US Work Permit Rules: ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा झटका! वर्क परमिट संपल्यावर नोकरी जाणार?

SCROLL FOR NEXT