छत्रपती संभाजीनगर

दर्जेदार सेवा द्या

CD
आपले सरकार केंद्रे सक्षम करा राज्य सेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव यांचे निर्देश धाराशिव, ता. ७ (बातमीदार) : गावातील नागरिकांना शासकीय सेवांसाठी रोजचे काम सोडून तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची वेळ येऊ नये. त्यांची कामे गावातच झाली पाहिजेत. ‘आपले सरकार’ सेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेत सेवा मिळाली पाहिजे, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मंगळवारी (ता. ६) महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत देण्यात येणाऱ्या सेवांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर उपस्थित होते. डॉ. जाधव म्हणाले, की नगरपालिका क्षेत्रातील ‘आपले सरकार’ सेवा केंद्रे पालिका प्रशासनाने तातडीने सक्रिय करावीत. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीतील कामगिरीच्या आधारे महसूल, ग्रामविकास व नगरपालिका क्षेत्रातील उत्कृष्ट केंद्रांची निवड केली जाणार आहे. नागरिकांना अधिकाधिक सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा. किमान ९० टक्के सेवा नियत कालावधीत देण्याचे उद्दिष्ट ठेवावे. पालिका क्षेत्रात लाभार्थी ऑफलाइन अर्ज घेऊन आल्यास तो ऑनलाइन करून देण्याची व्यवस्था करावी. जिल्हाधिकारी पुजार म्हणाले की, धाराशिव येथील आदर्श ‘आपले सरकार’ सेवा केंद्र तृतीयपंथी व्यक्तीकडून चांगल्या प्रकारे चालविले जात आहे. जिल्ह्यात तहसील कार्यालयांच्या ठिकाणी नव्याने आदर्श सेवा केंद्रे उभारण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात एकूण ८४९ ‘आपले सरकार’ सेवा केंद्रे असून, त्यापैकी ६९५ केंद्रे सक्रियपणे सेवा देत आहेत. बैठकीत विविध विभागांच्या सेवांची माहिती सादर करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : 'कोणी मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही'; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही केलं भाष्य

CJP Jantar Mantar Protest: शनिवारी सीजेपीचं पुन्हा 'जंतरमंतर'! मुख्य प्रवक्ते सौरव दास दिल्ली पोलिसांच्या भेटीला, म्हणाले...

केस गळायला लागले, विग बनवून घेतले तरीही सोनाली बेंद्रेने ते घातलेच नाहीत, पण का? म्हणाली, 'बोलायला खूप सोपं वाटतं पण...

IND vs WI 2nd T20I: नितीश रेड्डी, प्रिन्स यादव IN, वैभव सूर्यवंशी बाकावरच; दुसऱ्या ट्वेंटी-२० साठी Playing XI मध्ये सूचवला बदल

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावाच लागेल - राहुल गांधी

SCROLL FOR NEXT