Leopard escapes from Sambhajinagar Abdul Sattar reacts  esakal
छत्रपती संभाजीनगर

Abdul Sattar: काय सांगता? अब्दुल सत्तारांनी बिबट्याला केलं 'राष्ट्रीय प्राणी'! म्हणाले, 3 दिवसांत जंगलात सोडा...

Abdul Sattar on leopard escape from Sambhajinagar : शनिवारी चिकलठाणा एमआयडीसीमधील एनएचके कंपनी परिसरात सकाळी ६ः४० च्या सुमारास बिबट्या दिसल्याचा दावा कंपनी कर्मचाऱ्यांनी केला. वन विभागाने तातडीने दखल घेत धाव घेतली.

Sandip Kapde

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील एमआयडीसी चिकलठाणा परिसरात एन.आर.बी कंपनीच्या लगत दिसलेल्या बिबट्याचा वन विभागाच्या पथकाने शोध घेतला परंतु अद्यापही हा बिबट्या आढळून आला नाही. गेल्या १४ दिवसांपासून या बिबट्याला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. मात्र हा बिबट्या वनविभागाला हुलकावणी देत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बिबट्याची शोध मोहीम सुरू राहील असे वन विभागाने सांगितले आहे.

अब्दुल सत्तारांचे निर्देश-

दरम्यान, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी चक्क बिबट्या हा राष्ट्रीय प्राणी असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे एकच चर्चा निर्माण झाली आहे. पालकमंत्र्यांना राष्ट्रीय प्राणी माहित नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यांनी वन विभागाला कडक सूचना दिल्या आहेत की, पुढील ३ दिवसात बिबट्याला पकडून जंगलात सोडावे. हे निर्देश दिल्याने स्थानिकांमध्ये चिंता आणि उत्सुकता दोन्ही वाढल्या आहेत.

पुनश्च बिबट्याचे दर्शन-

पंधरा जुलैपासून संपूर्ण शहराची चिंता वाढवणाऱ्या बिबट्याची चर्चा २३ जुलैपर्यंत ओसरली होती. परंतु शनिवारी पुन्हा चिकलठाणा एमआयडीसीकडे बिबट्याचे दर्शन झाल्याचा दावा आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी केला. वन विभागाने संपूर्ण एमआयडीसी चिकलठाणा परिसर धुंडाळला पण, बिबट्याचा वावर असल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. मात्र, यानिमित्ताने शहरात पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याची चर्चा सुरू झाली.

सीसीटीव्ही आणि तपासणी-

शनिवारी चिकलठाणा एमआयडीसीमधील एनएचके कंपनी परिसरात सकाळी ६ः४० च्या सुमारास बिबट्या दिसल्याचा दावा कंपनी कर्मचाऱ्यांनी केला. वन विभागाने तातडीने दखल घेत धाव घेतली. वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब तौर यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने एनएचके कंपनीसह इथल्या संपूर्ण परिसरात बिबट्याचा शोध घेतला. इथल्या बहुतांश कंपन्या बंद असल्याने इथे बिबट्या असण्याची शक्यता होती. त्यामुळे वन विभागाने इथले सीसीटीव्ही तपासले आणि सायंकाळपर्यंत संपूर्ण कंपन्यांची पाहणी केली.

वन्यप्राणी दिसल्यास नागरिकांनी वन विभागाला १९२६ या टोल फ्री नंबरवर किंवा वन परिक्षेत्र अधिकारी दादासाहेब तौर यांना ९५७९२७१५५२ या क्रमांकावर संपर्क करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT