छत्रपती संभाजीनगर

विनापरवानगी गैरहजर शिक्षकांवर होणार कारवाई

CD
विनापरवानगी गैरहजर शिक्षकांवर होणार कारवाई ---- हजेरी अहवाल मागविणार; नेमलेल्या ठिकाणी काम करणे बंधनकारक ---- सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर, ता. २० : विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा वेळ आणि शिक्षकांच्या उपस्थितीबाबत आता तडजोड केली जाणार नाही. शाळा सोडून विनापरवानगी अन्यत्र काम करणाऱ्या किंवा नियुक्तीच्या ठिकाणी गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांची हजेरी तपासून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांनी दिला. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासोबतच शिक्षकांची जबाबदारी निश्चित करण्याचा निर्धार सरोदे यांनी सोमवारी (ता. १९) माध्यमांसमोर व्यक्त केला. खासगी शाळांप्रमाणे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या यंत्रणेचा प्रभावी वापर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी पदभार स्वीकारल्यानंतर सरोदे यांनी शिक्षणातील गुणवत्ता, शिक्षकांची उपस्थिती आणि शाळांमधील सुविधांबाबत भूमिका मांडली होती. शिक्षकांना ज्या ठिकाणी काम करण्यासाठी नियुक्त केले आहे, तेथे त्यांनी नियमितपणे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शिकविणे अपेक्षित आहे. यामुळे यापुढे विनापरवानगी अन्यत्र काम करणे किंवा नियुक्तीच्या ठिकाणी अनुपस्थित राहणे आढळल्यास संबंधित शिक्षकांचा हजेरी अहवाल मागविण्यात येईल. या अहवालाआधारे नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा सरोदे यांनी दिला. -- सर्व शाळांच्या गुणवत्तावाढीवर भर जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे आवश्यक आहे. खासगी शाळांप्रमाणे या शाळांमध्येही शिक्षणाचा दर्जा असावा, यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील. यासाठी विभागातील अधिनस्थ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्षमतेचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केला जाईल. कोणत्याही विशिष्ट शाळेला लक्ष्य करण्याचा हेतू नसून, सर्व शाळांमध्ये समानपणे सुधारणा करण्यावर भर राहील, असे सरोदे यांनी स्पष्ट केले. ---- आचारसंहितेनंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्ह्यातील २१४ अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबतही त्यांनी माहिती दिली. प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, अतिरिक्त शिक्षकांना समायोजनातून पदस्थापना दिली जाईल. माध्यमिक आणि उर्दू शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. आचारसंहिता संपल्यानंतर समायोजनाची सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Electronics Prices: दसरा-दिवाळीपूर्वी ग्राहकांना मोठा धक्का; एसी, एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशिनच्या किमती वाढणार

Dussehra Shopping: आज दसरा ;वाहन, सोने, गृह, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खरेदीवर ग्राहकांचा भर १,२०० कोटींची उलाढाल अपेक्षित

Latest Marathi News Live Update : दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना; भाषणाकडे सर्वांचे लक्ष

Dussehra 2026: खंडेनवमी आणि दसरा यात नेमका काय फरक? शस्त्रपूजा नक्की कोणत्या दिवशी करावी?

Dussehra History : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दसरा कसा साजरा व्हायचा? इतिहासातील रंजक गोष्टी!

SCROLL FOR NEXT