aurangabad aurangabad
छत्रपती संभाजीनगर

मुंबई-नागपूर महामार्गावरील भीषण अपघातात एकाच गावातील तिघांचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या अपघातात मयत झालेले तिघे शिल्लेगाव येथील रहिवासी असल्याने गावावर शोककळा पसरली आहे

अविनाश संगेकर

अज्ञात वाहनाच्या अपघातात मयत झालेले तिघे शिल्लेगाव येथील रहिवासी असल्याने गावावर शोककळा पसरली आहे

लासुर स्टेशन (औरंगाबाद): औरंगाबादहून नागपूर-मुंबई महामार्गाने जाणाऱ्या दुचाकीचा अज्ञात वाहनाशी झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एका गंभीर जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी (ता.12) मध्यरात्री वसुसायगावजवळ घडली. गणेश बाळू जाधव (वय38) आणि नितीन अंबादास जाधव (वय28 ) दोघे (राहणार शिल्लेगाव ता.गंगापूर) हे दोघेजण घटनास्थळीच जागीच ठार झाले. तर गणेश तुकाराम जाधव (वय26) या गंभीर जखमीचा शुक्रवारी (ता.13) उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अज्ञात वाहनाच्या अपघातात मयत झालेले तिघे शिल्लेगाव येथील रहिवासी असल्याने गावावर शोककळा पसरली आहे. दुचाकीवरील तिघांचाही मृत्य झाल्याने अपघात नेमका कसा झाला हे समजणे कठीण झाले आहे. घटनेची माहिती कळताच शिल्लेगावचे पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. ठार झालेल्या दोघांना लासुर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले होते तर गंभीर जखमी असलेल्या गणेशला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले होते. मात्र शुक्रवारी उपचारादरम्यान गणेशचाही मृत्यू झाला त्यामुळे शिल्लेगावात या दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिल्लेगाव येथील तिघे त्यांच्याकडील मोटरसायकलने औरंगाबादकडून घराकडे शिल्लेगावला जात असतानी नागपूर-मुंबई मार्गावरील वसुसायगाव जवळ कोणत्यातरी एका भरधाव अज्ञात वाहनाच्या दुचाकीशी अपघात होऊन दुचाकीवरील दोघांच्या डोक्याला जास्त मार लागल्याने जागीच मृत्यू झाला होता. तर एक जण गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी पोलिसांनी औरंगाबाद येथे हलविले होते. सदरील घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेली आहे, अशी माहिती शिल्लेगाव पोलिसांनी दिली आहे. शवविच्छेदनानंतर शुक्रवारी या तिघांवर शिल्लेगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अपघाताचा अधिक तपास पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jio IPO मध्ये गुंतवणुकीची शेवटची संधी! कोणत्या कॅटेगरीतून अर्ज केल्यास फायदा? PAN आणि कॅटेगरीचे नियम समजून घ्या

Nagpur News: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी २,५३५ कर्मचारी तैनात; सहा जिल्ह्यांतील २.५५ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क,

IND vs NZ 2nd T20I : मोठी बातमी: भारताच्या स्टार फलंदाजाला दुखापत, पुढच्या मॅचला मुकणार; वैभव सूर्यवंशीला अखेर संधी मिळणार...

Marathi News Live Updates : शेतातील रस्त्याच्या वादातून दोन शेतकरी कुटुंबांत तुफान हाणामारी

Gokul Election Results Mahayuti Meeting : 29 ऑक्टोबरला 'गोकुळ'च्या अध्यक्षपदाची निवड! त्याआधी 28 ऑक्टोबरला महायुतीची होणार महत्त्वाची बैठक; काय येणार समोर?

SCROLL FOR NEXT