sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : कार-दुचाकीच्या अपघातात एक ठार ; सावंगी बायपासवरील घटना,कारचालक फरारी

सावंगी बायपासने केंब्रिजकडून सावंगी गावाकडे जाणाऱ्या दुचाकी (एमएच२० डीआर ५१०३) आणि कारचा (एमएच ५ एएक्स ९२०४) गुरुवारी (ता. दोन) रात्री साडेनऊच्या सुमारास अपघात झाला. यात दुचाकीचालक ठार झाला.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : सावंगी बायपासने केंब्रिजकडून सावंगी गावाकडे जाणाऱ्या दुचाकी (एमएच२० डीआर ५१०३) आणि कारचा (एमएच ५ एएक्स ९२०४) गुरुवारी (ता. दोन) रात्री साडेनऊच्या सुमारास अपघात झाला. यात दुचाकीचालक ठार झाला. दरम्यान, कार चालक फरार झाला. शागीर शाह शब्बीर शाह (रा. अन्वी डोंगरगाव, ता. सिल्लोड) असे मृताचे नाव आहे. यामुळे या रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

घटनेनंतर काही नागरिकांनी पोलिसांसह १०८ रुग्णवाहिकेला फोन केला. पहिल्यांदा चिकलठाणा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यापाठोपाठ सिडको एमआयडीसी पोलिस दाखल झाले. त्यानंतर सिडको एमआयडीसीच्या पोलिसांनी त्यांच्या वाहनातून मृतदेह घाटी रुग्णालयाकडे रवाना केला, अशी माहिती पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांनी दिली. दरम्यान, कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

रुग्णवाहिका उशिरा

काही नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेला फोन लावला. ही रुग्णवाहिका तब्बल तासभर उशिराने आली. पण, मृतदेह आम्ही घेऊन जात नसल्याने सांगत रुग्णवाहिका तशीच परत गेली. १०८ रुग्णवाहिका वेळेवर आली नसल्याचेही प्रत्यक्षदर्शी, पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT