sambhaji nagar  esakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : बहीण-भावाच्या मृत्यूप्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी

त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोघांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

वाळूजमहानगर, ता. १६ (बातमीदार) ः बजाजनगर येथे खेळता खेळता पाण्यात पडून बुडाल्याने दोघा सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

वाळूज औद्योगिक वसाहतीतील महिला कामगार विद्या राहुल देशमुख (३५) या स्टरलाइट कंपनी समोर, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर येथील तानाजी सरडे यांच्या घरात भाड्याने राहतात. त्यांची मुलगी चैताली (१०) व मुलगा समर्थ (७) हे दोन्ही मुले खेळता-खेळता आरोपी अशोक शिनगारे व नितीन गायकवाड यांनी इमारतीच्या पायाच्या बांधकामासाठी केलेल्या खड्ड्यात पडून दोघेही मरण पावले.

शुक्रवारी (ता.१५) रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत प्रकरणी विद्या देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी अशोक शिंगारे व नितीन गायकवाड यांनी खोदून ठेवलेल्या खड्यात ही दोन्ही मुले बुडून मरण पावली. या खड्ड्याभोवती सुरक्षेसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. उघड्यावर असलेल्या या खड्ड्यात सांडपाणी भरून ठेवले होते. त्यात दोन्ही मुले पडली. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने म्हणून दोन्ही आरोपींविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सचिन डाके यांनी आरोपीस अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देशभरात रविवारी कँडल मार्च, CJPची घोषणा; विद्यार्थी-पालकांसह समर्थकांना सहभागी होण्याचं आवाहन

Prakash Ambedkar: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र; प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केला पुढचा प्लॅन; आठवड्याची दिली डेडलाइन

रस्त्यावर लोखंडी प्लेट्स खिळ्यांनी बसवल्या घट्ट, वेल्डिंगनंतर चेनने बांधून उभारली बॅरिकेड्सची भिंत, जंतर मंतरवर पोलीस सज्ज

Live Updates Marathi : नागपूर येथील संघ मुख्यालयाला घेराव घातल्याच्या खोट्या पोस्टप्रकरणी गुन्हा

Akola Crime News: १६ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पोलिसाने ठेवले संबंध, नंतर दिला नकार; पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT