छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : गुलमंडीवर आज पुन्हा कारवाई

पोलिस बंदोबस्तात होणार अतिक्रमणांची पाडापाडी

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडी भागात महापालिकेने सोमवारी (ता. ११) अतिक्रमण हटाव मोहीम राबविली होती. रंगारगल्ली, कुंभारवाडा, मच्छलीखडक भागात ३४ अतिक्रमणे काढण्यात आली, पण या किरकोळ कारवाईनंतर पुन्हा या परिसराला हातगाड्यांचा विळखा पडला आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. १४) पुन्हा या भागात पोलिस बंदोबस्तात कारवाई केली जाणार आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडी, औरंगपुरा, रंगारगल्ली, कुंभारवाडा, टीळकपथ, सिटीचौक, सराफा, शहागंज भागाला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. दुकानदारांनी दुकानांसमोर पत्र्याचे शेड करून ओटे बांधले आहेत. त्यापुढे अनेक ठिकाणी हातगाड्या थांबतात.

त्यामुळे सणासुदीच्या काळात या भागातून नागरिकांना पायी चालणे देखील अवघड होते. काही दिवसांपूर्वी महापालिकेने सुपारी हनुमान मंदिरासमोरील अतिक्रमणे हटविली होती. त्यानंतर सोमवारी या भागात महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी पाहणी केल्यानंतर अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकाने कारवाई केली. पण सायंकाळनंतर पुन्हा रस्त्यांना अतिक्रमणांचा विळखा पडला. मंगळवार (ता. १३), बुधवार (ता.१३) महापालिकेचे पथक या भागात फिरकले नाही.

दरम्यान आता गुरुवारी गुलमंडीसह, सराफा, शहागंज भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाणार आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी सांगितले की, गुरुवारी केवळ गुलमंडीच नव्हे तर इतर भागातही कारवाई करण्यात येईल. त्यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. केवळ एक-दोन कारवाया करून या भागातील अतिक्रमणांचा प्रश्‍न मिटणार नाही, तर सतत पथकाची या भागात गस्त राहील, असे जोशी यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT