Sambhaji Nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : जन्मदात्यांना दूर लोटल्यास ॲक्शन ! ; प्रेमापोटी मुलांच्या नावावर केलेली मालमत्ता घेणार परत

लाडाने वाढविलेली मुले पुढे वृद्ध आई-वडिलांना घरातून हाकलून देतात, घरात असले तरी त्यांचा नीट सांभाळ करीत नाहीत. यापुढे हे चालणार नाही. ज्येष्ठांचा सांभाळ होतो किंवा नाही, हे पाहण्याची जबाबदारी आता तलाठ्यांवर सोपविण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : लाडाने वाढविलेली मुले पुढे वृद्ध आई-वडिलांना घरातून हाकलून देतात, घरात असले तरी त्यांचा नीट सांभाळ करीत नाहीत. यापुढे हे चालणार नाही. ज्येष्ठांचा सांभाळ होतो किंवा नाही, हे पाहण्याची जबाबदारी आता तलाठ्यांवर सोपविण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. हतबल आई-वडिलांनी केवळ तोंडी तक्रार जरी केली तरी त्याची तातडीने दखल घेतली जाईल. तोंडी तक्रार तलाठी लेखी स्वरूपात घेऊन पुढील कारवाई करतील. ज्येष्ठ नागरिकांना सन्मान मिळवून देण्याचे हे धोरण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

आई-वडिलांची हेळसांड होणार नाही, यासाठी विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी शासनाचे परिपत्रक आणि न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी विशेष पुढाकार घेतला आहे. याविषयी त्यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली. ज्यांनी जन्म दिला, मोठे केले, प्रेमाचा वर्षाव केला त्या वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्याऐवजी त्यांची हेळसांड करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

यासंदर्भात शासनाने ९ जुलै २०१८ रोजी ‘राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण २०१३’ ची अंमलबजावणी करण्याचे आदेश काढले आहेत. यासंदर्भात न्यायालयानेही वेळोवेळी निर्णय दिलेले आहेत. आई-वडील, ज्येष्ठ नागरिक यांच्या वृद्धापकाळात त्यांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे, त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय उपचार आणि सन्मानाने वागणूक मिळणे आवश्यक आहे. विभागीय आयुक्तांनी पुढाकार घेत शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदाऱ्या निश्चित करून परिपत्रक जारी केले आहे.

आई-वडिलांनी सर्व प्रॉपर्टी मुलाच्या नावे केली असली तरीही तलाठ्याकडे जर तक्रार आली तर ती परत काढून घेण्याची कारवाई करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील सर्व तलाठी सज्जांअंतर्गत ६० वर्षे व त्यावरील आई-वडील, ज्येष्ठ नागरिकांना सन्मान मिळवून दिला जाणार आहे.

अशी होईल कारवाई

जे मुले, मुली किंवा नातेवाईक त्यांच्या आई-वडिलांची किंवा ज्येष्ठांची काळजी घेत नसतील किंवा त्यांना सन्मानाची वागणूक देत नसतील व मालमत्ता हस्तांतरणाच्या वेळी दिलेला शब्द पाळत नसतील तर केवळ तोंडी तक्रार ग्राह्य धरून त्याचे लेखी तक्रारीत रूपांतरित केले जाईल. यानंतर त्या आई-वडिलांना किंवा ज्येष्ठांना मालमत्तेचा फेरहक्क मिळवून देण्यासाठीची कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

मुलाने बळकावलेली मालमत्ता पुन्हा आई-वडिलांना बहाल करण्याचीही यात तरतूद आहे. संबंधित पोलिस ठाण्याच्या अंतर्गत राहणाऱ्या ज्येष्ठांची यादी तयार करून त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी तलाठी यांनी प्रयत्न करणे, प्रत्येक महिन्यातून ज्येष्ठांची भेट घेणे, त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे. तलाठी आपले काम चोख करतात की नाही, हे पाहण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची राहणार आहे.

  •  माता-पित्यांना कुठलाही त्रास द्याल तर खबरदार

  •  केवळ तोंडी तक्रारीची दखल घेऊन करणार कारवाई

  •  तलाठी, जिल्हाधिकारी यांच्यावर जबाबदारी

  •  विभागीय आयुक्तांनी घेतला पुढाकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, लहानपणीच पितृछत्र हरपलं, आईने कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT