file photo 
छत्रपती संभाजीनगर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार ऍडव्हान्टेज महाएक्‍स्पोचे उद्‌घाटन

प्रकाश बनकर

औरंगाबाद: मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडिस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर (मसिआ)तर्फे 9 ते 12 जानेवारी दरम्यान सातवा ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो 2020चे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (ता.9) या एक्‍स्पोचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे.

तर समारोपाच्या कार्यक्रमास केंद्रीयमंत्री नितीन गडकरी येणार आहे. या महाएक्‍स्पो मध्ये देशभरातील विविध प्रकारचे 444 स्टॉल असणार आहे. अशी माहिती मसिआचे अध्यक्ष ज्ञानदेव राजळे यांनी रविवारी (ता.5) पत्रकार परिषदेत दिली. 

कलाग्राम येथील मैदानावर चार दिवस हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक्‍स्पो चालणार आहे. प्रदर्शनात लहान,मध्यम तसेच मोठ्या सर्वच प्रकारच्या उद्योगांनी आपला सहभाग नोंदविला आहे. जगभर निर्यात होणारी शेकडो प्रकारची उत्पादने, तंत्रज्ञानात झालेली प्रगती, अनेक अनोखे प्रयोग आणि अभिमान वाटावी अशी मराठवाड्यातील उद्योजकांची गरुडभरारी यातून प्रदर्शित होणार आहे.

या प्रदर्शनास राज्य शासन, पर्यटन विकास महामंडळ आणि औरंगाबाद, केंद्र सरकारच्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, एमएसएमई राष्ट्रीय लघुउद्योगक निगम आणि राज्य शासनाचा उद्योग विभाग यांचे सहकार्य लाभले आहे. 

या एक्‍स्पो विषयी एक्‍स्पोचे समन्वयक सुनील किर्दक म्हणाले, औरंगाबाद आणि मराठवाड्यातील विकास झाला पाहिजेत हे दाखवण्याची संधी या एक्‍स्पोतून होणार आहे.

या एक्‍स्पोतून नुसते प्रदर्शन नाही तर,यासह विविध विषयावर चर्चासत्र होणार आहे. भविष्यातील संधी,ऍग्रोप्रोसेसिंग, युवा संवाद होणार आहे. या वेळी ज्ञानदेव राजळे, सुनील किर्दक, जनसंपर्क प्रमुख अब्दुल शेख आणि उद्योजक गायके उपस्थित होते. 
हेही वाचा हप्तेखोरी, अतिक्रमणांनी घोटला फुटपाथचा गळा

स्ट्रेथ ऑफ मराठवाडातून दिसणार उद्योजकांची कार्यशैली 

मेड इन इंडियातून उद्योजकांना प्रमोट करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे मराठवाड्यातील उद्योजकांची काय क्षमता आहे, इथे कोणते उत्पादन, पार्ट तयार होतात. यांची संपुर्ण माहिती देण्यासाठी एक्‍स्पोमधून मेड इन औरंगाबाद हे स्ट्रेथ ऑफ मराठवाड्या यातून सर्वांना दाखविण्यात येणार आहे.

मराठवाड्यातून खऱ्या अर्थांने सीड हब, टेक्‍नालॉजी, फूड प्रसोसिग, देशी-विदेशी प्रॉडक्‍शन, हेरिटेज मराठवाडा हे सर्व यातून दाखविण्यात येणार आहे. 16 एकरात हे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक विषयाचे स्वतंत्र दालन असणार आहे.

या स्टॉल मध्ये 50 स्टॉल महाराष्ट्राबाहेर जाणार आहे. तर 400 स्टॉल हे राज्यभरातील आहे. यासह या प्रदर्शनातून 10 ते 12 स्टॅट अप सुरु केलेल्यांना निमंत्रण केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live : श्रेयस अय्यरचा अजंबित करणारा निर्णय; शुभमन गिलच्या संघाला दिली आयती संधी, जाणून घ्या संघांची Playing XI

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

Dombivli Crime: आलिशान बंगल्यात मोठा शस्त्रसाठा अन्...; ‘गँगस्टर स्टाईल’ रील स्टारला पुन्हा अटक, ठाण्यात खळबळ

मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...

प्रेक्षकांना कसा वाटला 'आनंदी' मालिकेचा पहिला भाग? कुणाला आवडला तर कुणाला खटकला, म्हणतात- तारिणीला हरवण्यासाठी...

SCROLL FOR NEXT