st bus sakal media
छत्रपती संभाजीनगर

तब्बल ३६ वर्ष सेवा केल्यानंतरही पेन्शन केवळ ८१० रुपये

अनिल जमधडे

औरंगाबाद : एसटी महामंडळात (Maharashtra State Transport Corporation) निवृत्त सहाय्यक वाहतूक निरीक्षकाने (Assistant Transport Inspector) तब्बल ३६ वर्षे सेवा केल्यानंतरही केवळ १५ वर्षांची सेवा ग्राह्य धरण्यात आली. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसल्याने न्याय द्यावा, अशी विनंती जगन्नाथ बागूल यांनी केली आहे. एसटी महामंडळात जगन्नाथ बागुल हे १९६७ मध्ये सेवेत रुजु झाले होते. मात्र १९८२ मध्ये ते आजारी पडल्याने १८ दिवस कार्यालयात हजर राहू शकले नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात निलंबन आणि नंतर (Aurangabad) बडतर्फीची कारवाई करण्यात आली. त्यामुळे त्यांनी कामगार न्यायालयात धाव घेतली, कामगार न्यायालयाने त्यांना सेवेत घेऊन लाभ देण्याचे आदेश दिले. त्यानंतर एसटीने त्यांना सेवेत रुजू करुन घेण्यात आले. मात्र २००३ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना खरा मनस्ताप सुरु झाला. तब्बल ३६ वर्ष सेवा केल्यानंतरही त्यांची सेवा केवळ १५ वर्षे दाखवण्यात आली आहे.

सेवा कमी दाखवण्यात आल्याने त्यांना केवळ ८१० रुपये पेन्शन मिळत आहे. तोकड्या पेन्शनमुळे त्यांना हलाखीचे दिवस काढावे लागत आहेत. त्यामुळेच आतापर्यंतचे एकूण ४९ वर्षाची थकीत सुधारीत वेतनश्रेणी दान उपदान व पदोन्नतीचे वाढीव रक्कम अंदाजे दहा लाख रुपये देण्याची मागणी जगन्नाथ बागुल यांनी केली आहे. या संदर्भात ते सातत्याने एसटीच्या विभाग नियंत्रकांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल

Latest Marathi News Live Update : फर्ग्युसन रस्त्यावरील वाहतूक आज काही वेळासाठी बंद करण्यात येणार

Panchang 3 October 2025: आजच्या दिवशी अर्गला स्तोत्र पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT