Ghati Hospital Death Esakal
छत्रपती संभाजीनगर

Ghati Hospital Death: राज्यातील सरकारी रुग्णालये व्हेंटिलेटरवर! आता घाटी रुग्णालयात २४ तासांत १० मृत्यूनं खळबळ

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात काल अशीच धक्कादायक घटना घडली होती

अंकिता खाणे (Ankita Khane)

छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या 10 मृतांमध्ये 2 बालकांचा देखील समावेश आहे. ठाणे, नांदेडनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्ण दगावल्यामुळे खळबळ उडाली आहे. तर घाटी रूग्णालयात पुढचे १५ दिवस पुरेल इतकाच औषधांचा साठा उपलब्ध आहे. ठाणे, नांदेडनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अत्यावस्थ परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. (Latest Marathi News)

तर गेल्या २४ तासांमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. घाटी हे शासकीय रुग्णालयात मराठवाड्यातील सर्वांत मोठे शासकीय रुग्णालय आहे. जवळपास १४ ते १६ जिल्ह्यातील रुग्ण या शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी येतात. त्याचबरोबर या रुग्णालयामध्ये पुढचे १५ दिवस पुरेल इतकाच औषधांचा साठा उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. (Marathi Tajya Batmya)

तर या रुग्णांच्या मृत्यूची कारणे विचारली असता, बाहेरच्या रूग्णालयातील रेफर करण्यात आलेल्या रूग्णांचा त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तर काल(सोमवारी) नांदेडमध्ये २४ तासांत २४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मराठवाड्यातील या दोन जिल्ह्यात ३४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यासंबधीचे वृत्त 'टिव्ही ९ मराठी'ने दिले आहे.

नांदेड जिल्ह्यातील शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात २४ तासांत तब्बल २४ जणांचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात २४ तासांत तब्बल २४ जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. (Latest Maharashtra News)

कळवा रुग्णालयात एकाच रात्री १८ जणांचा मृत्यू

दोन महिन्यापूर्वी ठाण्यातील महापालिकेच्या कळवा रुग्णालयात एकाच रात्री १८ जणांचा मृत्यू झालेली घटना गांभिर्याने घेतली नसल्याने या अत्यंत गंभीर घटनेचे पुनरावृत्ती झाल्याचे शरद पवार म्हणाले आहेत. तसेच ये सरकारी यंत्रणांचे अपयश असल्याचे देखील पवार म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Crude Oil: होर्मुझ तणावात भारताचा 'ऑइल मास्टरस्ट्रोक’! कच्चे तेल आणण्यासाठी नवा मार्ग; रशिया ठरला गेमचेंजर...

Latest Marathi News Live Update : विशाळगडावरील कुर्बनीला कोल्हापूर सर्किट बेंचकडून परवानगी

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

Chanakya Life Guide : लोक अचानकपणे तुम्हाला इज्जत देणं का बंद करतात? तुमचं कुठं चुकतं पाहा

SCROLL FOR NEXT