रोहन आगलावे
रोहन आगलावे 
छत्रपती संभाजीनगर

मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,पण रोहनचे आयुष्य संपले

शेख मुनाफ

आडुळ (जि.औरंगाबाद) : अवघ्या पाच किलोमीटरच्या अंतरात दुचाकीचे तिन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात सहा जण जखमी, तर एक जण ठार झाल्याच्या घटना औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील (Aurangabad-Solapur Highway) भालगाव फाटा ते पिंपळगाव फाट्यादरम्यान रविवारी (ता.१९) घडल्या. रविवारी संध्याकाळी रोहन सुभाष आगलावे (वय २०, रा. पांढरी, ता.औरंगाबाद) (Aurangabad) हा तरुण पिंपळगाव फाटा येथे मित्राच्या वाढदिवसाचा केक कापून घरी परत येत असताना पिंपळगाव फाटा येथे औरंगाबादकडुन भरधाव (Accident In Aurangabad) वेगाने आडुळकडे जाणाऱ्या कारने (एमएच २० सीएच ४३७०) रोहन याच्या दुचाकीला (एमएच २० सी ए ३१९७) जोराची धडक दिली. यात रोहन व कारमधील तिन जण जखमी झाले. जखमींना औरंगाबाद येथे हलविण्यात आले.

मात्र उपचारादरम्यान रोहन आगलावे या तरुणाचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत मन्सुरखा महेबुबखा प़ठाण (वय ६०, राहणार आडुळ बु. ता.पैठण) है आडुळहुन कुंभेफळ येथे मोसंबी बागेच्या मोसंबी तोडण्यासाठी दुचाकी (एमएच २० ए एक्स २१०९) ने जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागे भरधाव वेगाने जाणारी कारने (एमएच ४४ बी २४०७) भालगाव फाटा (ता.औरंगाबाद) येथे त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात मन्सूरखा पठाण हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरु आहे. तर पिंपळगाव शिवारातील हॉटेल गीतांजलीजवळ चालु दुचाकीवर मागे बसलेली महिला व तिचा बाळ अचानक खाली पडल्याने दोन्ही जखमी झाले होते. भालगाव फाटा अपघाताची नोंद चिकलठाणा पोलीस ठाण्यात, तर पिंपळगाव फाटा येथील घटनेची नोंद करमाड पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, बिट जमादार रंजीत दुलत, विनोद खिल्लारे, सुनील गोरे,शेख आवेज यांनी घटनास्थळी भेट दिली.

मित्राला उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. पण स्वतः

मित्राचा वाढदिवस असल्याने पिंपळगाव फाटा येथे मित्राचा वाढदिवसाचा केक कापला. मित्राला उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. आणि परत घरी येत असतांना भरधाव कारने रोहनचे आयुष्य संपविले. मित्राचा वाढदिवस रोहनचा अंतिम दिवस ठरला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडिल पोलिसांच्या ताब्यात; संभाजीनगरमधून केले अटक

Mumbai Election: सोमवारी ठाकरे गटाच्या पोलिंग एजेंटचा टॉयलेटमध्ये मृत्यू, तर निवडणूक अधिकाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

Yoga Tips : थकवा अन् अशक्तपणापासून आराम मिळवण्यासाठी दररोज करा 'ही' योगासने, जाणून घ्या सरावाची पद्धत

Kalyani Nagar Accident : पुणेकरांच्या तीव्र प्रतिक्रिया...फक्त सामान्य नागरिकांनाच कायदे लागू आहेत का?

Latest Marathi News Live Update: 300 ग्रामपंचायतींच्या प्रशासक नियुक्तीला स्थगिती

SCROLL FOR NEXT