Agitations for water Against the Aurangabad corporation  esakal
छत्रपती संभाजीनगर

भला मोठा कर पाणी मात्र घोटभर!

हडकोतील संतप्त नागरिकांचे महापालिकेच्या विरोधात

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरात पाण्यासाठी आंदोलने सुरूच असून, हडको भागातील नवनाथ नगर भागात शनिवारी (ता. १६) आठव्या दिवशीही नळाला पाणी न आल्याने संतप्त महिला, नागरिक रिकामे हंडे घेऊन रस्त्यावर उतरले. घरात स्वच्छतागृहात वापरण्यासाठी देखील पाणी नसल्याचा निषेध करत टॉयलेट पेपर नेत हे आंदोलक रिकाम्या टाकीवर पोचले. याठिकाणी महापालिकेच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात आला.

सिडको-हडकोचा पाणी प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर दोनवेळा आंदोलने झाली. पुंडलीकनगर येथील टाकीवर चढून नागरिकांनी रोष व्यक्त केला. त्यानंतर शनिवारी हडकोतील नवनाथनगर भागातील नागरिक रस्त्यावर उतरले. आंदोलनाविषयी डॉ. रवींद्र मुरकुटे यांनी सांगितले की, एसबीओ शाळेच्या पाठीमागील नवनाथनगर भागात गेल्या रविवारी पाणी आले होते. शुक्रवारी पाणी येणे अपेक्षीत होते. पण शनिवारी देखील नळाला पाणी आले नाही. या भागात सर्वसामान्य नागरिक राहतात. टॅंकरने पाणी विकत घेण्याची त्यांची ऐपत नाही आणि महापालिकेतर्फे नळाव्दारे अर्धा तास दिले जाणारे पाणी तीन-चार दिवस कसरतीने वापरावे लागते.

याविषयी प्रशासनाकडे वारंवार रोष व्यक्त केल्यानंतरही दखल घेतली जात नाही. शनिवारी अनेकांच्या घरी पाण्याचा थेंबही नव्हता. त्यामुळे आता स्वच्छतागृहात टॉयलेट पेपर वापरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाचा निषेध म्हणून आम्ही ‘टॉयलेट’ आंदोलन केले. या भागात अर्धवट काम झालेली पाण्याची टाकी आहे आहे, त्याठिकाणी जाऊन नागरिकांनी रोष व्यक्त केला. महापालिका प्रशासनाने आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही. आंदोलनात किरण पगारे, शुभम गाडेकर, चंद्रकांत जाधव, विशाल दौड, श्रीमती जाधव, श्रीमती वाघ यांच्यासह महिला, नागरिक सहभागी झाले होते.

फेरी काढून निषेध

नागरिक, महिलांनी रिकामे हंडे हातात घेऊन ढोल-ताशे वाजवत परिसरातून फेरी काढली. ‘भला मोठा कर पाणी मात्र थेंबभर’, पाणी पुरवठा विभागाचा निषेध, पाण्याचा नाही फिक्स वेळ सामान्यांचा चालविला खेळ, असे फलक घेऊन नागरिक, महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: सचिन जाधवर मृत्यू प्रकरणात पोलिस तपासावर संशय; वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनाफोनी कशासाठी?

Hapus Mango : पुण्यात हापूस दाखल! पेटीला १५ हजार; केशरचीही पहिली आवक

Sahar Sheikh: ‘मी घाबरणार नाही’; आरोपांवर AIMIM नगरसेविका सहर शेख यांचे ठाम उत्तर, नवीन वक्तव्य चर्चेत? म्हणाल्या...

T20 World Cup 2026 Update: बांगलादेश पाठोपाठ आता पाकिस्तानही ‘टी- 20’ विश्वचषकात नाही खेळणार?

Mohol News : अठरा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीने वसतीगृहातच गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT