कृषी अधिकारी कार्यालयातील
अधिकारी-कर्मचाऱ्यांची बांधिलकी
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक दिवसाचे वेतन
सोनपेठ, ता.२१ (बातमीदार) : शेतकऱ्यांसमोर निर्माण होणाऱ्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ३२ तांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य कृषी सेवा महासंघ पुणे यांच्या वतीने राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी कृषी विभागातील तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने वेतन देण्याचा निर्णय घेतला. शेतकरी हा कृषी विभागाच्या कार्याचा केंद्रबिंदू असून, त्यांच्या अडचणीच्या काळात कार्यालयीन जबाबदारीसोबत सामाजिक बांधिलकी जपणे आवश्यक आहे, अशी भावना कृषी सेवा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. संभाव्य संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. तालुक्यातील ३२ तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांप्रती असलेली संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा असल्याचे कृषी सेवा महासंघ सोनपेठ यांच्या वतीने सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी सातत्याने कार्यरत असून, नैसर्गिक संकटाच्या काळात प्रशासनाच्या मदतीसोबतच सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.