कृषी-औद्योगिक विकासाचे आव्हान
स्वीकारणे काळाची गरज : अस्वले
-----
उमरगा, ता. १७ (बातमीदार) : स्वातंत्र्याच्या साडेसात दशकानंतर आज शेती, उद्योग, आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी विचारमंथन व संशोधन करणे हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी केले. याप्रसंगी इतिहास अभ्यासक डॉ. गिरिधर सोमवंशी यांचे मुख्य व्याख्यान झाले.
डॉ. सोमवंशी यांनी उमरगा, गुंजोटी व नाईचाकूर परिसरातील जनतेच्या आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा आढावा घेतला. रझाकारांच्या अत्याचाराविरोधात देवीसिंग चौहान आणि तात्याराव मोरे यांनी दिलेल्या संघर्षाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. विनोद देवरकर, डॉ. पद्माकर पिटले, प्रा. जी.एस. मोरे, प्रा. शैलेश महामुनी, डॉ. सुभाष इंगळे व प्रा. दत्तात्रय लोभे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. देवरकर यांनी तर आभार उपप्राचार्य प्रा. जी.एस. मोरे यांनी मानले.
-----
श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळ
श्रमजीवी शिक्षण प्रसारक संस्थेच्या विविध विद्याशाखांमध्ये अध्यक्ष विनायक पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ संस्थाचालक भाऊसाहेब सोमवंशी, मल्लिनाथ दंडगे, पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच श्रमजीवी अध्यापक महाविद्यालयात प्राचार्य डॉ. विजय सरपे यांच्या हस्ते स्वामी रामानंदतीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास डॉ. प्रवीण कदम, प्रा. भाऊ पवार, प्रा. देविदास चव्हाण आदी उपस्थित होते.
-----
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, तलमोड
शाळेत स्वातंत्र्यसेनानींच्या पत्नी चिंगूबाई नरसिंग सगर यांच्या हस्ते ध्वजवंदन व स्वामी रामानंदतीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते, भाषणे व रांगोळी सादर केली. मुख्याध्यापक जे.ए. मोरे, जे.जी. जाधव, एम.आर. सूर्यवंशी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
-----
शरणप्पा मलंग विद्यालय व कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिर
वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम.एस. मलंग यांच्या हस्ते ध्वजवंदन व प्रतिमा पूजन झाले. बालाजी हिप्परगे यांनी ऑपरेशन पोलो व पहिले हुतात्मा वेदप्रकाश आर्य यांच्या संघर्षाची माहिती दिली. कार्यक्रमास शिवशंकर हंडरे, संजय मलंग, मुख्याध्यापक अजित गोबारे व कविराज रेड्डी उपस्थित होते. सूत्रसंचालन मीनाक्षी जाधव यांनी तर आभार बसवराज साखरे यांनी मानले.
-----
महात्मा गांधी विद्यालय, उमरगा
मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांच्या हस्ते ध्वजवंदन व स्वामी रामानंदतीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. विद्यार्थ्यांनी भाषणे, नृत्ये व देशभक्तिपर गीते सादर केली. या प्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक एन. व्ही. कांबळे, डी.आर. गायकवाड, डी.एस. सरवदे यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
----
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी, उमरगा
प्राचार्य डॉ. कवलजीत बिराजदार यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजवंदन करण्यात आले. डॉ. बिराजदार यांनी विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास सांगून स्वातंत्र्याच्या मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले. या वेळी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
-----
UMR26A18467 --- उमरगा : श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी मार्गदर्शन केले.
-----
UMR26A18471
उमरगा : शरणाप्पा मलंग विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष डॉ. एम. एस. मलंग यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
-----
UMR26A18469
उमरगा : श्रमजीवी अध्यापक महाविद्यालयात प्राचार्य डॉ. विजय सरपे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
-----
इतिहास आचरणात उतरवण्याची गरज : घोडके
मुरूम : मराठवाड्याच्या मातीला स्वातंत्र्यलढ्याचा मोठा वारसा लाभला असून, हा इतिहास केवळ पुस्तकी ज्ञानापुरता मर्यादित न ठेवता आचरणात उतरवण्याची गरज आहे. मराठवाड्याचा इतिहास हा केवळ पुस्तकांतील मजकूर नसून, प्रत्येक नागरिकाच्या धमन्यांत वाहणाऱ्या देशभक्तीशी जोडलेले नाते आहे, असे प्रतिपादन राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सायबण्णा घोडके यांनी केले. श्री. माधवराव पाटील महाविद्यालयात ‘मराठवाडा मुक्ती दिन : त्याग, बलिदान आणि प्रेरणा’ या विषयावर घोडके बोलत होते. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, भाऊसाहेब वैशंपायन आणि बाबूराव परांजपे यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाचा प्रवास त्यांनी उलगडला. जात, धर्म आणि प्रांतीय भेद विसरून एकात्मतेची भावना जोपासणे हीच हुतात्म्यांना खरी आदरांजली ठरेल, असा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे, प्रा.डॉ. राम बजगिरे उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. जयश्री सोमवंशी, सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुजित मटकरी यांनी तर आभार डॉ. रमेश आडे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
-----
PDA26A05461
परंडा : ज्ञानभाग्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी शिवसेना (यूबिटी) सिद्धेश्वर पाटील, आनंद खर्डेकर, प्राचार्य तौसिफ शेख, दत्तात्रय कांबळे उपस्थित होते.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.