agriculture minister abdul sattar atul save dhananjay munde sanjay bansode get portfolio ncp cm eknath shinde politics sakal
छत्रपती संभाजीनगर

Maharashtra Politics : मंत्रिमंडळात मराठवाडा : सत्तार, सावेंच्या खातेबदलाने साधले शुद्धीकरण!

Maharashtra Political News : कृषी मंत्रिपद राखले, सहकार खाते गेले, गृहनिर्माण मात्र मिळाले

- दयानंद माने

Chhatrapati Sambhaji Nagar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मंत्रिमंडळात अजित पवार यांचा गट समाविष्ट झाल्यानंतर मराठवाड्यातील धनंजय मुंडे व संजय बनसोडे या मंत्र्यांनाही आज खाते वाटप जाहीर झाले.

धनंजय मुंडे यांना वादग्रस्त ठरलेल्या अब्दुल सत्तार यांचे कृषी खाते बहाल करण्यात आले आहे. तर संजय बनसोडे यांना क्रीडा, युवककल्याण व बंदरे ही खाती देण्यात आली आहेत. या दोन मंत्र्यांमुळे राज्य मंत्रिमंडळात मराठवाड्यातील मंत्र्यांची संख्या सहा झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत मोठी फूट पाडून विद्यमान भाजप व शिवसेना (शिंदे गट) सरकारसोबत जायचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात राजकीय खळबळ उडाली होती. त्यानंतर सत्ताधारी भाजप, शिंदे गटाच्या इच्छुक आमदारांतही मंत्रिमंडळातील समावेशावरून असंतोष निर्माण झाला होता.

शिंदे, फडणवीस व पवार यांना तीन रात्रीत सातत्याने बैठकांचा सपाटा लावून खातेवाटपाचा निर्णय घेतला. आता केवळ खातेवाटप झाल्याने शिंदे गटातील इच्छुक आमदार संजय शिरसाट यांच्या मंत्रिपद आणखी दूर गेले आहे.

तसेच कलंकित कृषिमंत्री अब्दुल सत्तार व निष्प्रभ सहकारमंत्री अतुल सावे यांना मात्र आपल्या खात्यांवर पाणी सोडावे लागले आहे. सत्तार यांनी कृषी खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना राबवून सिल्लोड येथे केलेला कृषी महोत्सव,

अकोला येथे बनावट पथके पाठवून कृषी निविष्ठा गोदामांवर घातलेले अवैध छापे, वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरण तसेच अनेक वादग्रस्त वक्तव्ये यांमुळे सत्तार यांचे मंत्रिपदच धोक्यात आले होते. त्यांना या पदावरून हटवून त्यांच्याकडे अल्पसंख्याक हे खाते देऊन त्यांचे पंख कापण्यात आले आहेत.

अतुल सावे हे खरे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निष्ठावान कार्यकर्ते. मात्र त्यांना सहकारासारखे महत्त्वाचे पद मिळूनही कसलीही छाप गेल्या वर्षभरात उमटविता आली नव्हती. त्यामुळे त्यांची या खात्यातून गच्छंती अपरिहार्य मानली जात होती.

सहकारात राष्ट्रवादीचे वर्चस्व लक्षात घेता अजित पवार यांच्या गटाकडे हे खाते जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. ती दिलीप वळसेंना हे खाते देऊन खरी ठरली आहे. अतुल सावे यांच्याकडे आता गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण ही तुलनेने कमी महत्त्वाची खाती मिळाली आहेत.

खरे पाहता मागच्या वेळी त्यांना उद्योग खाते मिळेल अशी चर्चा होती. मात्र ते खाते शिंदे गटाचे उदय सामंत यांच्याकडे असल्याने ते मिळणे शक्य नव्हते. अशा प्रकारे सत्तार व सावे यांच्या खाते बदलाने मंत्रिमंडळाने शुद्धीकरण साधले आहे.

मराठवाड्यातील अजित पवार गटाचे तरुण मंत्री व उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे क्रीडा व युवक कल्याण व बंदरे हे खाते आले आहे. मराठवाड्यातील आणखी दोन मंत्री आरोग्यमंत्री तानाजी सावंत व रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी आपली मंत्रिपदे राखली आहेत.

आता पुढील टप्पा विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन व पालकमंत्र्यांची निवड हा असेल. तसेच आगामी काळात या सरकारवर न्यायालयातील प्रलंबित याचिका तसेच मतदारांच्या आव्हानांचे ओझेही मोठ्या प्रमाणावर असल्याने या मंत्रिमंडळाच्या कारभाराकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT